क्राईम डायरीमुख्य बातम्या

किचनमध्येच पंख्याला विवाहितेने घेतला गळफास; शेगावमधील खळबळजनक घटना

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः 32 वर्षीय महिलेने घरातील किचनमधील सिलिंग फॅनला दोरीने गळफास घेऊन आत्‍महत्‍या केली. ही घटना काल, 1 जुलैच्‍या सकाळी शेगाव शहरातील रायली फैलमध्ये समोर आली.

सौ. प्रतिभा गणेश चंदनशिव असे आत्‍महत्‍या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. तिला एक वर्षे व पाच वर्षे वयाच्‍या दोन मुली आहेत. तिचे पती गणेश रेल्वेत नोकरी करतात. 30 जूनला रात्री घरातील सर्व मंडळी जेवण करून झोपले होते. पहाटे पाचला सौ. आशा चंदनशिव झोपेतून उठल्यानंतर त्‍यांना सून सौ. प्रतिभाने आत्‍महत्‍या केल्याचे दिसले. त्‍यांनी आरडाओरड केली. प्रतिभाला रुग्णालयात नेले असता डाॅक्टरांनी तपासून मृत्‍यू झाल्याचे सांगितले. दोन चिमुकल्या मुलींचे मातृछत्र हरवल्याने परिसरात हळहळ व्‍यक्‍त होत आहे. आत्‍महत्‍येचे कारण आज, 2 जुलैलाही समोर आले नव्‍हते.

Related Articles

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
Close
%d bloggers like this: