क्राईम डायरीमुख्य बातम्या

किती ही क्रूरता… पायावर बसून कुऱ्हाडीने तोडला पाय!; खामगाव तालुक्‍यातील सिनेस्‍टाईल थरार

खामगाव ( भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः संतापातून किती क्रूरता एखाद्यात येऊ शकते, याचे प्रत्‍यंतर खामगाव तालुक्‍यातील शेलोडी येथे दिसून आले आहे. जुन्या वादाची तक्रार मागे घेण्यास नकार दिला म्‍हणून आरोपी युवकाच्‍या पायावर बसले आणि कुऱ्हाडीने पाय तोडला. त्‍याआधी गावातीलच एकाला त्‍याला आणायला पाठवले होते. दुचाकीवर बसवून खोटे बोलून गावापासून दूर आणले आणि कांड केले. अंगावर शहारे आणणरी ही घटना काल, 29 जून रोजी दुपारी 1 च्या घडली.

सागर संजय राऊत (32, रा. शेलोडी) असे गंभीर जखमी युवकाचे नाव आहे. सागरचे गावातीलच सुनील इंगळे याच्यासोबत जुने वाद आहे. वादातूनच सागरने खमगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात इंगळे विरोधात तक्रार दिली होती. काल दुपारी 1 च्या सुमारास संतोष येवले (रा. शेलोडी) याने सागरला मोटारसायकलवर बसवून गावापासून दूर नेले. त्याठिकाणी आरोपी सुनील पुंजाजी इंगळे, बंडू भगवान इंगळे, महेंद्र सुनील इंगळे, नंदू अनिल इंगळे, सुभाष पुंजाजी इंगळे, सुधाकर भगवान इंगळे, राज बोदडे, सदानंद इंगळे आधीपासून हजर होते. त्यांनी सागरला तू दिलेला जुना रिपोर्ट मागे घे असे म्हटले. मात्र सागरने नकार दिला. त्यामुळे संतापलेल्‍या आरोपींनी सागरच्या पायावर बसून कुऱ्हाडीने पाय तोडला. एवढ्यावरच ते थांबले नाहीत. वखराची पास पायावर मारली.

काठीने पाठीवर ,दंडावर व हातावर जबर मारहाण केली. यात सागर राऊत गंभीर जखमी झाल्याने त्याला पुढील उपचारासाठी नागपूर येथे हलविण्यात आले आहे. याप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी सागरला मारहाण करणाऱ्या 9 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तपास खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशन चे पोहेकाँ देवराव धांडे करत आहेत.

Related Articles

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
Close
%d bloggers like this: