कोरोना अपडेट्सबुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

कुंड बुद्रूक कोरोनाच्‍या दाढेत! बाधितांचा आकडा 36 वर; जिल्ह्यात 4 बळी!!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 17 मार्चला कोरोनाने 4 बळी घेतले असून, उपचारादरम्यान गोंधनपूर ता. खामगाव येथील 65 वर्षीय पुरुष, लासुरा ता. शेगाव येथील 85 वर्षीय पुरुष, सुभाषनगर चिखली येथील 58 वर्षीय पुरुष व हिवरा आश्रम ता. मेहकर येथील 85 वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला आहे. मलकापूर तालुक्‍यातील कुंड बुद्रूक येथे परिस्‍थिती बिकट झाली असून, गावात दिवसभरात 20 पॉझिटिव्‍ह रुग्‍ण आढळले असून, परवा 16 रुग्‍ण समोर आले होते. त्‍यामुळे हे छोटेसे खेडे अक्षरशः कोरोनाच्‍या दाढेत आले असून, बाधितांचा आकडा 36 वर गेला आहे. दरम्‍यान, जिल्ह्यात 690 पॉझिटिव्‍ह रुग्‍णांची नव्‍याने भर पडली असून, 304 रुग्‍णांनी कोरोनावर मात केल्याने त्‍यांना डिस्‍चार्ज देण्यात आला आहे.

प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 5092 अहवाल प्राप्त झाले आहेत. पैकी 4402 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून, 690 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 358 व रॅपीड टेस्टमधील 332 अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 637 तर रॅपिड टेस्टमधील 3765 अहवालांचा समावेश आहे.

पॉझिटिव्ह आलेले अहवाल
बुलडाणा शहर : 95, बुलडाणा तालुका : जांब 1, सुंदरखेड 1, दहीद 4, गोंधनखेड 2, पाडळी 2, धाड 8, चांडोळ 1, वालसावंगी 1, अंबोडा 2,सागवन 1, दत्तपूर 1, उबाळखेड 1, गिरडा 3, मढ 1, चिंचपूर 1, डोंगरखंडाळा 1, शिरपूर 2, चिखली शहर : 57, चिखली तालुका : किन्होळा 1, शेलूद 1, कोलारा 1, टाकरखेड हेलगा 2, उंद्री 4, कोळेगाव 1,पेठ 1, सवणा 2, भालगाव 3, सोमठाणा 2, कोनड 3, खैरव 2, पळसखेड जयंती 1, वैरागड 1, इसरूळ 2, अंचरवाडी 1, अमोना 1, रोहडा 1, किन्ही नाईक 2, काटोडा 3, बोरगाव काकडे 2, शेलसूर 2, खंडाळा 3, अमडापूर 1, ढासाळवाडी 3, चांधई 1, मलगी 9, नायगाव 2, पांढरदेव 2, इसोली 1, देऊळगाव घुबे 2, मेहकर शहर : 10, मेहकर तालुका : सारंगपूर 1, दौलत गव्हाण 2, लोणी गवळी 1, हिवरा आश्रम 2, देऊळगाव माळी 1, जानेफळ 2, जळगाव जामोद शहर : 6, जळगाव जामोद तालुका : इस्लामपूर 1, बोराडा 1, आसलगाव 1, नांदुरा शहर : 27, नांदुरा तालुका : निमगाव 1, महाळुंगी 2, माळेगाव गोंड 1, आलमपूर 2, नारखेड 2, वडनेर 9, टाकळी 2, धानोरा 1, शेंबा 1, पातोंडा 1, मोताळा तालुका : शेलगाव बाजार 2, खरबडी 1, महाल पिंप्री 1,पिंप्री गवळी 1, किन्होळा 6, पिंपळगाव देवी 2, बोराखेडी 7, मोताळा शहर : 23, शेगाव शहर : 74, शेगाव तालुका : माटरगाव 1, गायगाव 1, जलंब 2, पहुरजिरा 1, गौलखेड 1, जवळा 1, शिरजगाव निळे 1, खामगाव शहर : 55, खामगाव तालुका : मांडका 1, लाखनवाडा 6, पिंप्री देशमुख 1, सुटाळा बुद्रूक 1, जनुना 1, आवार 2, चिंचपूर 7, आंबेटाकळी 2, पळशी 1, शिर्ला नेमाने 1, मलकापूर शहर : 19, मलकापूर तालुका : वाघुड 1, नरवेल 3, घिर्णी 1, दाताळा 1, पिंपळखुटा 1, माकनेर 1, मोरखेड खु 1, लासुरा 6, कुंड बुद्रूक 20, उमाळी 1, वडजी 1, वरखेड 1, दुधलगाव 1, लोणवडी 4, सिंदखेड राजा तालुका : झोटिंगा 1, भोसा 2, रताळी 6, साखरखेर्डा 4, शिंदी 1, वसंतनगर 7, हिवरा गडलिंग 1, शेलगाव राऊत 1, ताडशिवणी 1, देऊळगाव कोळ 1, सावखेड तेजन 2, देऊळगाव राजा शहर : 25, देऊळगाव राजा तालुका : दगडवाडी 1, सुरा 1, देऊळगाव मही 3, पिंप्री आंधळे 1, सिनगाव जहा 10, खल्याळ गव्हाण 1, संग्रामपूर तालुका : लोहगाव 1, लाडनापूर 1, निवाणा 1, लोणार शहर : 8, लोणार तालुका : हिरडव 1, मूळ पत्ता हरणखेड ता. बोदवड 1, कसुरा ता. बाळापूर 1, माळेगाव ता. तेल्हारा 1, काजीखेड ता. बाळापूर 1 अशाप्रकारे जिल्ह्यात 690 रुग्ण आढळले आहे.

304 रुग्‍णांनी केली कोरोनावर मात
आज 304 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. विविध तालुक्यांतील कोविड केअर सेंटरनुसार सुटी देण्यात आलेले रुग्ण असे ः बुलडाणा : अपंग 7, मुलींचे वसतिगृह 72, कोविड हॉस्पिटल 5, आशीर्वाद हॉस्पिटल 7, सिद्धीविनायक हॉस्पिटल 4, सहयोग 1, खामगाव : 63, चिखली : 42, देऊळगाव राजा : 30, लोणार : 8, जळगाव जामोद : 9, सिंदखेड राजा : 1, मोताळा : 4, संग्रामपूर : 4, मेहकर : 23, मलकापूर : 4, शेगाव : 20.

बळींचा आकडा 226 वर
आजपर्यंत 167258 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 22683 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 22683 आहे. तसेच 3617 स्वॅब नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 167258 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 26920 कोरोनाबाधित रुग्ण असून, त्यापैकी 22683 कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रुग्‍णालयात 4011 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत 226 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते यांनी दिली आहे.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: