बुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

कुंड बुद्रूक, देवधाबामध्ये कोरोना उद्रेक; बुलडाण्याच्‍या एकाचा बळी!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 15 मार्चला कोरोनाने आणखी एक बळी घेतला असून, उपचारादरम्यान बुलडाण्याच्‍या केशवनगरातील 67 वर्षीय पुरुषाचा मृत्‍यू झाला आहे. दरम्‍यान, मलकापूर ग्रामीण भागात कोरोनाने अक्षरशः थैमान मांडल्याचे चित्र असून, या तालुक्‍यातील कुंड बुद्रूकला तब्‍बल 16  व देवधाबा येथे ११ रुग्‍ण आढळले आहेत. दरम्‍यान, दिवसभरात जिल्ह्यात 533 नव्‍या बाधितांची भर पडली असून, 462 रुग्‍णांना रुग्‍णालयातून डिस्‍चार्ज मिळाला आहे.

प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 2093 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 1560 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 533 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहेत. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 407 व रॅपीड टेस्टमधील 126 अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतून 456 तर रॅपिड टेस्टमधील 1104 अहवालांचा समावेश आहे.

पॉझिटिव्‍ह आलेले अहवाल

मलकापूर शहर : 95, मलकापूर तालुका : जांबुळधाबा 1, वडोदा 1, वरखेड 1, निमखेड 1, विवरा 3, भाडगणी 1, आळंद 11, कुंड बुद्रूक 16, देवधाबा 11, बुलडाणा शहर : 86, बुलडाणा तालुका : गोंधनखेड 1, धाड 2, मासरूळ 2, डोंगरखंडाळा 1, साखळी बुद्रूक 1, उमाळा 3, नांद्राकोळी 3, रूईखेड टेकाळे 1, पोखरी 3, चिखली शहर : 22, चिखली तालुका : केळवद 1, शेलसूर 1, शेलूद 2, पेठ 1, करवंड 1, हातणी 2, टाकरखेड 1, इसरूळ 1, सवणा 1, किन्होळा 3, मेहकर शहर : 2, मेहकर तालुका : हिवरा आश्रम 1, शेगाव शहर : 58, शेगाव तालुका : जवळा 5, माटरगाव 1, जलंब 8, गौलखेड 1, झाडेगाव 1, लासुरा 1, खामगाव शहर : 73, खामगाव तालुका : पिंप्री कोरडे 1, लाखनवाडा 1, शिर्ला नेमाने 1, हिवरखेड 2, टेंभुर्णा 1, अंत्रज 2, पोरज 4, घाटपुरी 3, पळशी 3, अटाळी 1, चिंचपूर 4, गणेशपूर 1, धामणगाव दे 1, संग्रामपूर तालुका : उकडगाव 1, पातुर्डा 2, सोनाळा 2, वरवट बकाल 1, लोणार शहर : 2, लोणार तालुका : भानखेडा 2, पळसखेडा 2, मोताळा शहर : 2, मोताळा तालुका : दाभाडी 3, शेलापूर 2, राजूर 7, कोथळी 1, नांदुरा तालुका : शिरसोळी 2, जिगाव 1, निमगाव 1, जळगाव जामोद शहर : 5, जळगाव जामोद तालुका : आसलगाव 3, देऊळगाव राजा तालुका : अंढेरा 1, दगडवाडी 1, सुरा 1, सिनगांव जहाँगिर 2, देऊळगाव राजा शहर : 6, सिंदखेड राजा तालुका : गुंज 1, वसंतनगर 5, शिवणी टाका 2, चिंचोली 1, निमगाव 1, सिंदखेड राजा शहर : 4, मूळ पत्ता वैभवनगर, धुळे 1, मंठा जि. जालना 1, अकोला 1, रिसोड जि. वाशिम 1, पारंबी ता. मुक्ताईनगर जि जळगाव 1, इंचा ता. मंठा जि. जालना येथील 1 अशाप्रकारे जिल्ह्यात 533 रुग्ण आढळले आहे.

462 रुग्‍णांची कोरोनावर मात

आज 462 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. कोविड केअर सेंटरनुसार सुटी देण्यात आलेले रुग्ण असे ः चिखली : 127, खामगाव : 42, बुलडाणा : सिद्धीविनायक हॉस्पीटल 6, सहयोग हॉस्पीटल 3, कोविड रुग्णालय 21, मुलींचे वसतिगृह 2, अपंग विद्यालय 44, देऊळगाव राजा : 39, मेहकर : 1, जळगाव जामोद : 12, सिंदखेड राजा : 26, नांदुरा : 12, मलकापूर : 44, शेगाव : 40, मोताळा : 26, संग्रामपूर : 6, लोणार : 11.

3578 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार

आजपर्यंत 160592 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 21865 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आज रोजी 2841 नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 25663 कोरोनाबाधित रुग्ण असून, सध्या रुग्णालयांत 3578 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 220 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: