बुलडाणा (घाटावर)

कृषि विभागाचा सल्ला ः मूग, उडीद पिकांवरील किडीचे व्यवस्थापन असे करा

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मूग व उडीद पिकावरील किडीच्‍या व्यवस्थापनसाठी उपाययोजना कराव्यात. शेत तण विरहीत ठेवावे. चरी, कोटो चवळी या तणावर विषाणू जिवंत राहतो व तेथूनच किडीद्वारे पिकावर येतो या तणाचा नाश करावा.

पिकात जास्त नवखत देणे टाळावे. त्यामुळे पिकाची कायीक वाढ होते व किडींचा प्रादुर्भाव वाढतो. पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतात पेरणीनंतर 15 दिवसांनी पिवळ चिकट सापळे 15 x 30 सेमी आकाराचे हेक्टरी 16 पिकाच्या उंचीच्या एक फूट उंचीवर लावावे. मावा, पांढरीमाशी व फुलकिडीचा प्रादुर्भाव दिसताच किंवा लिफ क्रिनकल विषाणुरोगांची सुरुवात दिसताच, फिप्रोनिल 5 टक्के एससी 20 मिली किंवा फोनोकामाईड 50 टक्के डब्ल्युजी 3 ग्रॅम किंवा इमिडाक्लोप्रीड 17.80 टक्के एसएल 2.5 मिली किंवा थायामेथोक्झाम 25 टक्के डब्ल्यूजी 4 ग्रॅम प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून पेरणीनंतर 25 ते 30 दिवसांनी फवारणी करावी.

मात्र ज्या शेतक यांनी बिजप्रक्रिया केली नाही, त्यांनी पिक उगवणीनंतर 15 ते 20 दिवसांनी वरीलपैकी कोणात्याही एका किटकनाशकाची फवारणी करावी व गरज वाटल्यास 15 दिवसांनी दुसरी फवारणी करावी. फवारणी करताना किटकनाशके आलटून पालटून वापरावे. यावर्षी पावसाचा खंड जास्त पडल्यामुळे काही भागामध्ये मुंगाची उशीरा पेरणी झाली, ते पीक सध्या 10 ते 15 दिवसांचे आहे. या पिकांवर वरीलप्रमाणे प्रादुर्भाव दिसताक्षणीच किंवा पुढील 10 ते 12 दिवसांनी किटक नाशकांची फवारणी करणे अत्यंत आवश्यक आहे, असे आवाहन कृषि विभागाने केले आहे.

Related Articles

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
Close
%d bloggers like this: