क्राईम डायरीमुख्य बातम्या

कॉम्प्युटर क्लासला गेलेली 21 वर्षीय तरुणी गायब!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात मुलींचे बेपत्ता होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. कॉम्‍प्‍युटर क्‍लास गेलेली 21 वर्षीय तरुणी बेपत्ता झाल्याची घटना बुलडाणा शहरात आज, 31 मार्चला समोर आली आहे. नीलम दिनकर ठोके (रा. खामगाव रोड, बुलडाणा) असे बेपत्ता तरुणीचे नाव आहे.

नीलम जिजामाता कॉलेजला बी.ए.चे शिक्षण घेत होती. सोबतच कॉम्प्युटरचे क्लास करत होती. 25  मार्च रोजी दुपारी कॉम्‍प्‍युटर क्लासला जाते असे सांगून ती घरून गेली होती. मात्र संध्याकाळपर्यंत परत न आल्याने तिचा शोध घेण्यात आला. मात्र ती कुठेच मिळून आली नाही.  25 मार्च पासुन तर आज 31 मार्चपर्यंत तिचा नातेवाईक व मित्रांकडे शोध घेऊनही ती न सापडल्याने मुलीच्या आईने आज बुलडाणा शहर ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. गोरा रंग, लांबट चेहरा, 5 फूट उंची, अंगात लाल  पंजाबी ड्रेस अशा वर्णनाची मुलगी हरवली असल्याची नोंद पोलिसांनी केली आहे.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: