क्राईम डायरीमुख्य बातम्या

कोतवाल सुरपाटणेंच्‍या सुसाईड नोटमधील तिघांविरुद्ध गुन्‍हा दाखल; शिपायाला अटक

मोताळा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) : मोताळा तहसील कार्यालयात कोतवाल असलेल्या विष्णू सुरपाटणे यांनी काल, 27 जूनला तहसीलदारांच्या शासकीय निवासस्थानात आत्महत्या केली होती. या प्रकरणी सुरपाटणे यांच्या मुलाने दिलेल्या तक्रारीवरून बोराखेडी पोलिसांनी आकस्मिक मृत्‍यूची नोंद केली होती. चौकशी दरम्यान मृतक सुरपाटणे यांच्या खिशात सुसाईड नोट आढळली होती. सुसाईड नोटमध्ये नेमके काय लिहिले आहे याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. आज, 28 जूनला पोलिसांनी याप्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करून तहसील कार्यालयातीलच एका शिपायाला ताब्‍यात घेतले आहे.

सुसाईड नोटमध्ये उल्लेख असलेल्या व्यक्तींविरुध्द गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी, असा आक्रमक पवित्रा मृतक सुरपाटणे यांच्या नातेवाइकांनी आज सकाळी घेतला होता. याप्रकरणी बोराखेडी पोलिसांनी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून, गुन्ह्याच्या तपासात नंदकिशोर पारखे (40, रा. मोताळा) याला ताब्‍यात घेण्यात आले आहे. या गुन्ह्यातील अन्य दोन आरोपींची नावे सांगण्यास तपासाच्या कारणास्तव पोलिसांनी असमर्थता दर्शविली. तपास पोलीस निरीक्षक माधवराव गरुड यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय राहुल जंजाळ, पोहेकाँ श्री. धांडे, पोकाँ पैठणे, पोकाँ मंगेश पाटील, पोकाँ श्री. सुरडकर, पोकाँ श्री. शिंदे करत आहेत.

Related Articles

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
Close
%d bloggers like this: