बुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

कोरोनविरुद्ध दुसरे युद्ध सुरू!, 1 मार्चपर्यंत नव्याने आरपारची लढाई!! ‘बुलडाणा लाईव्ह’चे भीती वजा भाकीत दुर्दैवाने खरे!

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः बुलडाणा जिल्ह्यासह अमरावती विभागात नव्याने उद्रेक वाढलेल्या कोरोना विरुद्धच्या दुसऱ्या युद्धाची आज, 21 फेब्रुवारीच्या संध्याकाळी घोषणा करण्यात आली! विविध निर्बंधाच्या आयुधासह 1 मार्चपर्यंत ही आरपारची लढाई चालणार आहे. जिल्ह्याने या लढाईत विजय मिळविला नाही तर ही लढाई आणखी लांबण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. या संदर्भात बुलडाणा लाईव्हने आज सकाळी प्रसारित वृत्तातील भीतीवजा भाकीत खरे ठरले आहे!
यापूर्वी विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी अमरावती विभागातील कोरोना महसंकटाचा आढावा घेतला. परिस्थिती हाताबाहेर जाण्याचे वास्तव स्वीकारून त्यांनी विभागात कोविड विरुद्धच्या लढाईचे रणशिंग फुंकले! सर्व जिल्हाधिकाऱ्यांना तपशीलवार निर्देश पाठवून आपल्या जिल्ह्यातील स्थिती लक्षात घेऊन आवश्यक निर्बंधासह सर्व उपाय योजना लागू करण्याचे आदेश दिलेत. यावर जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी जिल्ह्यात आपल्या अधिकारात विविध निर्बंध लागू केले.

हे आहेत निर्बंध

 • दुकाने सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंतच सुरू राहतील.
 • कार्यालयात 15 टक्के उपस्थिती, हॉटेल्समध्ये पार्सल सुविधाच.
 • लग्नांना 25 वऱ्हाडींची मुभा.
 • प्रवासी वाहतुकीवर मर्यादा.
 • बस मध्ये 50 टक्के प्रवासी.
 • धार्मिक स्थळी 10 भविकांनाच मुभा , मंडई संध्याकाळी 6 वाजेपर्यंत पण किरकोळ विक्रेत्यांनाच परवानगी.
 • सर्व शाळा, कॉलेज, कोचिंग क्लासेस, शिकवणी वर्ग बंद
 • सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमांना बंदी.
 • मिशन बिगीन अगेन अंतर्गतची सूट रद्द.
 • सिनेमा, व्यायामशाळा, जलतरण तलाव, उद्याने, नाट्यगृहे, बंद

याला आहे मुभा

 • मालवाहतूक सुरू
 • चारचाकीमध्ये चालक व 3 प्रवासी, ऑटोमध्ये चालक व 2 प्रवासी, दुचाकीवर हेल्मेट मास्कसह 2 जणांना मुभा.
 • एसटी बसमध्ये 50 टक्के प्रवासी.
 • शैक्षणिक कार्यालये, कर्मचाऱ्यांना इ-माहिती, उत्तर पत्रिका तपासणी, निकाल जाहीर करणे याची मंजुरी.
 • उद्योग सुरू राहणार.
 • सकाळी 8 वाजेपर्यंत व्यायाम, फिरणे यास परवानगी. खासगी आस्थापनांत 15 टक्के किंवा 15 कर्मचारी यांना मुभा.
 • लग्नास वधूवरासह 25 जणांना परवानगी.
 • दुकाने सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंतच
 • कंटेन्मेंट झोनमध्ये किराणा, रेशन आदी अत्यावश्यक दुकाने सकाळी 8 ते दुपारी 3 वाजेपर्यंत सुरू राहतील. व्यायाम व फिरण्यास मनाई, अत्यावश्यक वगळता सर्व दुकाने बंद

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: