बुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

कोरोनाचा ‘तरुण’ बळी! चार महिलांचेही घेतले प्राण!!; 113 पॉझिटिव्‍ह, 901 डिस्‍चार्ज

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 31 मे रोजी 113 पॉझिटिव्‍ह रुग्‍ण समोर आले असून, 901 रुग्‍णांना बरे झाल्याने डिस्‍चार्ज देण्यात आला आहे. रोज जाणारे बळी मात्र चिंता वाढवणारेच आहेत. आजही 5 बळी कोरोनाने घेतले आहेत. उपचारादरम्‍यान इसोली (ता. चिखली) येथील 75 वर्षीय महिला, चिखली येथील 55 वर्षीय महिला, सुटाळा (ता. खामगाव) येथील 28 वर्षीय पुरुष, जिगाव (ता. नांदुरा) येथील 75 वर्षीय महिला, मेहकर येथील 75 वर्षीय महिला रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 2394 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 2281 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून, 113 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहेत. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 71 व रॅपीड टेस्टमधील 42 अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतून 1080 तर रॅपिड टेस्टमधील 1201 अहवालांचा समावेश आहे.

पॉझिटिव्‍ह आलेले अहवाल
बुलडाणा शहर : 13, बुलडाणा तालुका : सागवन 1, केसापूर 1, भादोला 1, येळगाव 1, मोताळा तालुका : पुन्हई 1, तळणी 1, अंत्री 1, खामगाव शहर :5, खामगाव तालुका : हिवरा 2, टाकळी 1, जयपूर लांडे 1, जनुना 1, शिर्ला 3, नागापूर 9, निळेगाव 1, शेगाव शहर : 5, शेगाव तालुका : भास्तन 1, चिखली शहर : 4, चिखली तालुका : सोमठाणा 2, रोहडा 2, शेलगाव आटोळ 2, खैरव 1, गांगलगाव 2, कव्हळा 1, मुरादपूर 2, मलकापूर शहर :1, मलकापूर तालुका : भाडगणी 1, उमाळी 1, देऊळगाव राजा शहर : 2 , देऊळगाव राजा तालुका : बोराखेडी 1, खल्याळ गव्हाण 1, संग्रामपूर तालुका : काकनवाडा 2, अकोली 4, निरोड 1, सिंदखेड राजा शहर :1, सिंदखेड राजा तालुका : चांगेफळ 1, सुलजगाव 1, असोला 2, ताडशिवणी 2, लिंगा 1, मेहकर शहर : 5, मेहकर तालुका : घाटबोरी 3, जळगाव जामोद तालुका : उसरा 1, काजेगाव 1, सुनगाव 1, नांदुरा शहर :1, नांदुरा तालुका : नायगाव 1, तांदुळवाडी 2, वळती 1, लोणार शहर : 2 , लोणार तालुका : देऊळगाव कोळ 2, परजिल्हा भोकरदन 1, तेल्हारा 1, बाळापूर 2 अशाप्रकारे जिल्ह्यात 113 रुग्ण आढळले आहेत.

901 रुग्‍णांची कोरोनावर मात
आज 901 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आजपर्यंत 480996 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 82343 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आज रोजी 364 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात आजअखेर एकूण 84778 कोरोनाबाधित रुग्ण असून, 1829 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 606 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

Related Articles

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
Close
%d bloggers like this: