बुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

कोरोनाचे दोन बळी!; नवे चार पॉझिटिव्‍ह रुग्‍ण समोर

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 24 जुलैला कोरोनामुळे दोन बळी गेले. उपचारादरम्यान नागझरी (ता. सिंदखेड राजा) येथील 80 वर्षीय महिला व मंडपगाव (ता. देऊळगाव राजा) येथील 33 वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात नवे 4 पॉझिटिव्‍ह रुग्‍ण समोर आले असून, 3 रुग्‍ण बरे झाल्याने त्‍यांना रुग्‍णालयातून डिस्‍चार्ज मिळाला आहे.

प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 1814 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 1810 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून, 4 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 3 व रॅपीड टेस्टमधील एका अहवालाचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतून 410 तर रॅपिड टेस्टमधील 1400 अहवालांचा समावेश आहे. आज 3 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आजपर्यंत 627043 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 86546 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आज रोजी 1621 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात आजअखेर एकूण 87233 कोरोनाबाधित रुग्ण असून, सद्यःस्थितीत कोविडचे 16 सक्रिय रुग्ण उपचार घेत आहेत. आजपर्यंत 671 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

Related Articles

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
Close
%d bloggers like this: