बुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

कोरोनाचे 4 बळी!; बाधितांचा आकडा 25 हजार पार!!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः कोरोनाने आज, 14 मार्चला 4 बळी घेतले. उपचारादरम्यान हिवरा आश्रम (ता. मेहकर) येथील 80 वर्षीय पुरुष, विष्णूवाडी, बुलडाणा येथील 70 वर्षीय महिला, संग्रामपूर येथील 80 वर्षीय पुरुष, मेहकर येथील 62 वर्षीय महिला रुग्णाचा मृत्यू झाला आहे. दरम्‍यान, दिवसभरात 661 नव्या बाधितांची जिल्ह्यात भर पडली असून, 445 रुग्‍णांनी कोरोनावर मात केल्याने त्‍यांना डिस्‍चार्ज मिळाला आहे.

प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 1943 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 1282 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 661 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहेत. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 552 व रॅपीड टेस्टमधील 109 अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतून 775 तर रॅपिड टेस्टमधील 507 अहवालांचा समावेश आहे.

पॉझिटिव्‍ह आलेले अहवाल

बुलडाणा शहर : 108, बुलडाणा तालुका : नांद्राकोळी 1, सुंदरखेड 4, पांगरी 1, भादोला 1,  खेर्डी 1, येळगाव 1, गिर्डा 4, डोंगरखंडाळा 1, सिंदखेड मातला 1, कोलवड 1, डोंगरशेवली 1, पाडळी 2, खुपगाव 1, बिरसिंगपूर 1, अंबोडा 1, शिरपूर 1, देऊळघाट 2, जामठी 2, सागवान 1,  खामगाव शहर : 37, खामगाव तालुका :  पिंपरी गवळी 1,  लाखनवाडा 1, लांजुड 1, अंबेटाकळी 1, चिंचपूर 2, हिवरा खुर्द 1, घाटपुरी 2, राहुड 1,  नांदुरा तालुका :  निमगाव 2, कोळंबा 4, वाडी 5, विटाळी 5, शेंबा 4, कडेगाव 1, शिरसोळी 1, तांदूळवाडी 2, जवळा बाजार 1, खैरा 1, मलकापूर शहर : 34, मलकापूर तालुका :  लोणवडी 31,  दाताळा 9, दुधलगाव 2, वडजी 23, वरखेड 2, वाडोदा 1, देवधाबा 1,  चिखली शहर : 21,  चिखली तालुका :  सवणा 1, दिवठणा 1, भोकर 2, कोलारा 1,  पळसखेड जयंती 2, सातगाव भुसारी 3, अमोणा 1, सोनेवाडी 1, मंगरुळ नवघरे 2, कोळेगाव 1, पेठ 1, शेलसुर 1, पळसखेड दौलत 1, दहिगाव 1, सोमठना 1, कोनड 1, उंद्री 3, मुंगसारी 1, करवंड 1,  सिंदखेड राजा शहर : 13, सिंदखेड राजा तालुका : साखरखेर्डा 1,  दुसरबीड 1,  राहेरी खुर्द 2, हनवतखेड 1, वरुडी 1, वसंतनगर 4, सावखेड तेजन 1, मोताळा तालुका :  कोथळी 1, राजूर 1, पिंपळगाव गवळी 1, किन्होळा 2, गुगळी 1, वारुडी 2, शेलापूर 1, काबरखेड 2,  मोताळा शहर : 3, शेगाव शहर : 21, शेगाव तालुका : नागझरी 10, भोण गाव 10, वरखेड 3, जवळा 1, बाभुळगाव 1,  संग्रामपूर तालुका : सोनाळा 6, बावणबीर 2, वानखेड 1, बोडखा 1, कवठळ 1,  जळगाव जामोद शहर : 30, जळगाव जामोद तालुका : कुरणगड बुद्रूक 3, सुपो पळशी 1, आसलगाव 6,  पिंपळगाव काळे 1, काजेगाव 7, जामोद 4, सुलज 1,  देऊळगाव राजा शहर : 24, देऊळगाव राजा तालुका : अंढेरा 1, चिंचोली बुरुकुल 18, गारखेड 1, गोळेगाव 1, दागडवाडी 1, देऊळगाव मही 1, वाकी 1,  लोणार शहर : 13, लोणार तालुका : हिरडव 1, अंजनी खुर्द 1, बिबी 2,  मेहकर शहर :29,  मेहकर तालुका :  हिवरा आश्रम 2, कळमेश्वर 10, पेनटाकळी 1, जानेफळ 2, ब्रह्मपुरी 1, सारंगपूर 2, अकोला ठाकरे 2, करंजी 1, देऊळगाव माळी 2, उकळी 3, बाभुळखेड 7, डोणगाव 2, शहापूर 1, कणका 1,  नांदुरा शहर : 15,   मूळ पत्ता जालना 1, पारस जि. अकोला 1, वाशिम 1, नागपूर 1, कारंजा जि. वाशिम1  अशाप्रकारे जिल्ह्यात 661 रुग्ण आढळले आहे.

445 रुग्‍णांना डिस्‍चार्ज

आज 445 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. कोविड केअर सेंटरनुसार सुटी देण्यात आलेले रुग्ण असे ः बुलडाणा : अपंग विद्यालय 45, कोविड हॉस्पिटल 59,  सिध्दीविनायक हॉस्पिटल 18, मुलींचे वसतिगृह 20,  शेगाव : 47, खामगाव : 25, नांदुरा : 28,  देऊळगाव राजा : 20, चिखली : 26, मेहकर : 20, लोणार : 22,  जळगाव जामोद : 29, सिंदखेड राजा : 13, मलकापूर : 52, संग्रामपूर : 3, मोताळा : 32.

3508 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार  सुरू

आजपर्यंत 159032 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 21403 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आज रोजी 2560 नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहे. जिल्ह्यात आज अखेर एकूण 25130 कोरोनाबाधित रुग्ण असून, सध्या  रुग्णालयांत 3508 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार  सुरू आहेत. आजपर्यंत 219 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: