देश-विदेश

कोरोनाने देशाचे स्मशान केले!; चोवीस तासांत साडेतीन हजार बळी

चार लाख नवीन कोरोना रुग्ण
नवी दिल्ली ः एकीकडे पश्चिम बंगाल निवडणुकांचे धक्कादायक निकाली हाती येत असतानाच, दुसरीकडे देशाचे स्मशान झाल्याचे पुढे आले आहे. गेल्या चोवीस तासात देशात तब्बल 3 हजार 689 कोरोना बळी गेले असून, त्यामुळे देशातील बळींचा आकडा आता दोन लाख 15 हजार 542 वर गेला आहे. तर गेल्या चोवीस तासांत 3.92 लाख कोरोना बाधितांची नव्याने भर पडली आहे.
केंद्रातील मोदी सरकारने कोरोना नियंत्रणासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करणे गरजेचे असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना स्थितीकडे दुर्लक्ष करत, पश्चिम बंगालमधील निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. राज्यांना वेळीच ऑक्सिजन व रेमेडेसीवर न मिळाल्याने देशात झपाट्याने कोरोना बळींची संख्या वाढली आहे. देशातील अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या तब्बल 33 लाखांवर जाऊन पोहोचली आहे. तर गेल्या चोवीस तासांत तब्बल तीन हजार 689 रुग्णांचे बळी गेले आहेत. विशेष बाब म्हणजे, कोरोना बाधितांचे रिकव्हरी प्रमाणही 81.77 टक्क्यांवर घसरले असून, देशभरात कोरोनाने आतापर्यंत दोन लाख 15 हजार 542 बळी घेतले आहेत.

महाराष्ट्रातील कोरोना उद्रेक कायम
महाराष्ट्रातील कोरोना उद्रेक कायम असून, गेल्या चोवीस तासांत तब्बल 63 हजार 282 नवीन कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर 802 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील कोरोना बाधितांची संख्या 46 लाख 65 हजार 754 वर जाऊन पोहोचली असून, त्यातील 6 लाख 63 हजार 758 इतके अ‍ॅक्टिव्ह केसेस आहेत. तर राज्याचा एकूण मृत्यूदर हा 1.49 वर जाऊन पोहोचला आहे. राज्यातील ठाकरे सरकारने मोठ्या शहरात कडक लॉगडाऊन लागू केलेला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
Close
%d bloggers like this: