बुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

कोरोनाबाधितांचा आकडा 18 हजारांच्‍या टप्‍प्‍यात!; झाडेगावसारख्या खेड्यात आणखी 29 बाधित आढळले; जिल्ह्यात 391 ची भर!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा 18 हजारांच्‍या टप्‍प्यात आला असून, आज, 26 फेब्रुवारीला नव्‍या 391 कोरोनाबाधितांची भर पडली आहे. 179 रुग्‍ण बरे झाल्याने त्‍यांना रुग्‍णालयातून डिस्‍चार्ज देण्यात आला आहे. झाडेगाव (ता. जळगाव जाामोद) येथे आणखी 29 बाधितांची भर पडल्‍याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. यापूर्वी या गावात तब्‍बल 155 रुग्‍ण आढळले होते.
प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 3664 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 3273 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 391 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहेत. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 322 व रॅपीड टेस्टमधील 69 अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतून 1945 तर रॅपिड टेस्टमधील 1328 अहवालांचा समावेश आहे.

पॉझिटिव्ह आलेले अहवाल

मलकापूर शहर : 27, मलकापूर तालुका : दाताळा 2, बेलाड 1, चिखली शहर : 16, चिखली तालुका : शिरपूर 3, कोलारा 1, शेलूद 1, मेरा खुर्द 1, भानखेडा 1, वरखेड 1, हातणी 2, सवणा 1, अमडापूर 2, मालगणी 1, नायगाव 1, पळसखेड दौलत 1, खामगाव शहर : 28, खामगाव तालुका : घारोड 1, किन्ही महादेव 1, सुटाळा 1, शिर्ला नेमाने 1, घाटपुरी 2, उमरा अटाळी 1, नांदुरा शहर : 40, नांदुरा तालुका : पोटळी 1, निमखेड 1, नायगाव 1, शेलगाव मुकूंद 2, टाकरखेड 1,काटी 1, वडनेर 1, शेगाव शहर : 14, शेगाव तालुका : भोनगांव 7, माटरगाव 1, आडसूळ 1, जळगाव जामोद शहर : 8, जळगाव जामोद तालुका : सुनगाव 4, खेर्डा 2, झाडेगाव 29, कुरणगड 1, मेहकर शहर : 11, मेहकर तालुका : हिवरा साबळे 1, देऊळगाव माळी 3, हिवरा आश्रम 3, कळमेश्वर 1, बऱ्हाई 4, देऊळगाव साकर्षा 1, शेंदला 5, लोणार शहर: 8, लोणार तालुका : शिवनगाव 1, आरडव 4, गोत्रा 1, बुलडाणा शहर : 51, बुलडाणा तालुका : वरवंड 1, मढ 1, पाडळी 1, मासरूळ 1, करडी 1, दुधा 1, रूईखेड 1, धामणदरी 1, येळगाव 1, गिरडा 1, सुंदरखेड 2, मोताळा शहर : 3, मोताळा तालुका : तळणी 1, बोराखेडी 3, तरोडा 3, देऊळगाव राजा शहर : 31, दे. राजा तालुका : सिनगाव जहागीर 5, अंढेरा 1, आळंद 1, देऊळगाव मही 2, संग्रामपूर तालुका : खिरोडा 1, पळशी झाशी 1, एकलारा 1, सिंदखेड राजा शहर : 6, सिंदखेड राजा तालुका : लिंगा 1, पांगरी उगले 1, दुसरबीड 2, पिंपळखुटा 1, चिंचोली 1, मूळ पत्ता वरूड जि. जालना 1, वळसा वडाळा ता. भोकरदन जि. जालना 1, अकोला 4, राजणी ता. जामनेर जि. जळगाव 1, आंबेजोगाई जि. बीड 1 अशाप्रकारे जिल्ह्यात 391 रूग्ण आढळले आहे.

179 रुग्‍णांनी केली कोरोनावर मात

आज 179 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. कोविड केअर सेंटरनुसार सुटी देण्यात आलेले रुग्‍ण असे ः खामगाव : 30, बुलडाणा : अपंग विद्यालय 15, स्त्री रुग्णालय 6, देऊळगाव राजा : 18, चिखली : 42, मलकापूर : 14, शेगाव : 11, लोणार : 6, मेहकर : 8, सिं. राजा : 9, मोताळा : 3, नांदुरा : 13.

2529 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू

आजपर्यंत 130645 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 15258 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आज रोजी 7957 नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहे. जिल्ह्यात आज अखेर एकूण 17979 कोरोनाबाधित रुग्ण असून, सध्या रुग्णालयात 2529 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 192 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: