खामगाव (घाटाखाली)बुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

कोरोनामुळे नांदुर्‍याच्या पुरुषाचा मृत्यू; जिल्ह्यात नव्या 58 बाधितांची भर

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 8 फेब्रुवारीला कोरोनाने आणखी एक बळी घेतला असून, उपचारादरम्यान नांदुरा येथील 67 वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात 58 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून, 49 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 304 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 246 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 58 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहेत. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 54 व रॅपीड टेस्टमधील 4 अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतून 178 तर रॅपिड टेस्टमधील 68 अहवालांचा समावेश आहे.
पॉझिटिव्ह आलेले अहवाल
मलकापूर शहर : 4, मोताळा तालुका : निमखेडी 1, बुलडाणा शहर : 13, बुलडाणा तालुका : वरवंड 3, खामगाव तालुका : कारखेड 2, चिखली तालुका : केळवद 1, अमडापूर 1, दिवठाणा 1,सावरगाव डुकरे 3, सिंदखेड राजा तालुका : साखरखेर्डा 1, राजेगाव 1, चिखली शहर : 7, देऊळगाव राजा शहर : 10, देऊळगाव राजा तालुका : निवडुंगा 1, गव्हाण 1, देऊळगाव घुबे 1, देऊळगाव मही 3, जवळखेड 1, अकोला देव 1
49 रुग्णांनी केली कोरोनावर मात
आज 49 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. कोविड केअर सेंटरनुसार सुटी देण्यात आलेले रुग्ण असे ः खामगाव : 10 , देऊळगाव राजा : 13, चिखली : 2, मेहकर : 1, सिंदखेड राजा : 6, मोताळा : 6, मलकापूर : 2, शेगाव : 6, बुलडाणा : अपंग विद्यालय 3.
350 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू
आजपर्यंत 112648 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 13854 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आज रोजी 964 नमुने अहवालाच्या प्रतीक्षेत आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 14377 कोरोनाबाधित रुग्ण असून सध्या रुग्णालयात 350 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 173 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: