बुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

कोरोनामुळे बुलडाण्यात महिलेचा मृत्‍यू; जिल्ह्यात 340 नवे बाधित

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 28 फेब्रुवारीला कोरोनाने 193 वा बळी घेतला असून, उपचारादरम्यान रामनगर, बुलडाणा येथील 60 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. दरम्‍यान, दिवसभरात 340 नवे पॉझिटिव्‍ह रुग्‍ण समोर आले असून, 284 रुग्‍ण बरे झाल्याने त्‍यांना रुग्‍णालयातून डिस्‍चार्ज देण्यात आला आहे.

प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 3600 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 3260 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून, 340 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहेत. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 275 व रॅपीड टेस्टमधील 65 अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतून 1600 तर रॅपिड टेस्टमधील 1660 अहवालांचा समावेश आहे.

पॉझिटिव्ह आलेले अहवाल

मलकापूर शहर : 9, मलकापूर तालुका : माकनेर 1, दाताळा 1, चिखली शहर : 11, चिखली तालुका : शेलूद 1, पळसखेड दोलत 2, देऊळगाव राजा शहर : 18, देऊळगाव राजा तालुका : अंढेरा 4, वाकी 2, सावंगी टेकाळे 4, सातेफळ 1, देऊळगाव मही 1,सिनगाव जहागीर 4, आळंद 4, बुलडाणा शहर : 41, बुलडाणा तालुका : सागवन 2, सुंदरखेड 1, शिरपूर 1, अंभोडा 6, माळविहिर 1, धाड 1, मोताळा शहर : 1, मोताळा तालुका : गुळभेली 1, जळगाव जामोद शहर : 7, जळगाव जामोद तालुका : झाडेगाव 7, धानोरा 1, आसलगाव 2, कुरणगड 12, खामगाव शहर : 25, खामगाव तालुका : घाटपुरी 4, निरोड 4, उमरा अटाळी 2, विहिगाव 2, रोहणा 1, पिं. राजा 1, हिवरखेड 21, शिरला नेमाने 1, शेगाव शहर : 30, शेगाव तालुका : भोन गाव 1, अळसना 1, जनोरी 9, टाकळी विरो 3, तरोडा कसबा 1, सिंदखेड राजा शहर : 3, सिंदखेड राजा तालुका : साखरखेर्डा 1, किनगाव राजा 1, लोणार तालुका : हिरडव 2, सुलतानपूर 2, मेहकर तालुका : जानेफळ 11, दुधा 1, मोळा 1, निंबा 1, कल्याणा 1, हिवरा साबळे 4, गजरखेड 6, डोणगाव 1, पेनसावंगी 2, देऊळगाव माळी 5, घाटबोरी 1, कळमेश्वर 1, मेहकर शहर :14, नांदुरा शहर :20, नांदुरा तालुका : वाडी 2, तरवाडी 1, तांदुळवाडी 2, मूळ पत्ता जाळीचा देव ता. भोकरदन 1, वाशिम येथील 1 अशाप्रकारे जिल्ह्यात 340 रुग्ण आढळले आहेत.
284 रुग्‍णांची कोरोनावर मात

आज 284 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. कोविड केअर सेंटरनुसार सुटी देण्यात आलेले रुग्ण असे ः बुलडाणा : स्त्री रूग्णालय 4, अपंग विद्यालय 29, कोविड रुग्णालय 9, देऊळगाव राजा : 50, चिखली : 71, नांदुरा : 10, जळगाव जामोद : 5, सिंदखेड राजा : 8, मलकापूर : 2, लोणार : 27, संग्रामपूर :2, खामगाव : 2, शेगाव : 22, मोताळा:6, मेहकर : 29.

2699 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू

आजपर्यंत 136832 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 15776 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आज रोजी 8589 नमुने अहवालाच्या प्रतीक्षेत आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 18668 कोरोनाबाधित रुग्ण असून, सध्या रुग्णालयात 2699 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत 193 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: