बुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

कोरोना : आज नवे २ रुग्‍ण!; १७ बाधितांवर उपचार सुरू

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 23 जुलैला अवघे दोन कोरोनाबाधित नव्याने आढळले आहेत, तर चार रुग्‍ण बरे झाल्याने डिस्‍चार्ज देण्यात आला. सध्या 17 रुग्‍ण उपचार घेत आहेत.

प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 1096 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 1094 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून, 2 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहेत. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये रॅपीड टेस्टमधील 2 अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतून 244 तर रॅपिड टेस्टमधील 850 अहवालांचा समावेश आहे.

पॉझिटिव्‍ह आलेले अहवाल
जळगाव जामोद तालुका : सताळी 1, चिखली शहर : राजा टॉवर 1

आजवर 86543 रुग्‍ण झाले बरे…
आज 4 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आजपर्यंत 625233 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 86543 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आज रोजी 1429 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 625233 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 87229 कोरोनाबाधित रुग्ण असून, पैकी 86543 कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्यःस्थितीत कोविडचे 17 सक्रीय रुग्ण उपचार घेत आहेत. आजपर्यंत 669 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

Related Articles

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
Close
%d bloggers like this: