कोरोना अपडेट्सबुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

कोरोना ः 34 ची भर, 37 जणांना डिस्चार्ज!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 9 फेब्रुवारीला 34 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून, 37 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 472 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 438 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून, 34 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहेत. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 27 व रॅपीड अँटिजेन टेस्टमधील 7 अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 273 तर रॅपिड टेस्टमधील 165 अहवालांचा समावेश आहे.
पॉझिटिव्ह आलेले अहवाल
नांदुरा शहर : 1, खामगाव शहर : 6, बुलडाणा शहर : 6, लोणार शहर : 1, लोणार तालुका : हत्ता 1, चिखली शहर : 4, चिखली तालुका : सवडत 1, देऊळगाव राजा शहर : 3, मेहकर शहर : 1, शेगाव शहर : 6, शेगाव तालुका : गायगाव 1, सांगवा 1, मोताळा तालुका : सारोळा पीर 1, मूळ पत्ता डोंगरगाव ता. बाळापूर जि. अकोला येथील 1 अशाप्रकारे जिल्ह्यात 34 रूग्ण आढळले आहेत.
37 रुग्णांनी केली कोरोनावर मात
आज 37 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. विविध तालुक्यांतील कोविड केअर सेंटरनुसार सुटी देण्यात आलेले रुग्ण असे ः देऊळगाव राजा : 8, खामगाव : 9, बुलडाणा : अपंग विद्यालय 15, चिखली : 1, शेगाव : 4.
347 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू
आजपर्यंत 113086 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 13891 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. तसेच 176 स्वॅब नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 14411 कोरोनाबाधित रुग्ण असून जिल्ह्यात सध्या रुग्णालयात 347 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 173 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: