बुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

कोरोना रुग्‍ण संख्या घटतेय, पण मृत्‍यूचे थैमान कायम!; 24 तासांत 7 बळी!

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यातील कोरोनाच्या संख्येत घट येत असल्याचे सुखद चित्र आहे. सलग तिसऱ्या दिवशी जिल्ह्यातील रुग्णसंख्या पाचशेच्या खाली आली असून, बुलडाणा वगळता सर्व 12 तालुके दुहेरी आकड्यात आहेत. मात्र मृत्यूचे थैमान कायम असून, गत्‌ 24 तासांत 7 जण दगावले आहेत.

25 मे रोजी 478 तर 24 तारखेला 427 पॉझिटिव्ह आले होते. आज 26 मे रोजीही 491  पेशंट आलेत. 5711 स्वॅब संकलन व 5950 चाचणी अहवाल असे भरीव आकडे असतानाही बाधित संख्या पाचशेच्या खाली आली आहे. बुलडाणा 105 वगळता इतर 12 तालुक्यांतील संख्या दुहेरी आहे. यातही खामगाव 62, देऊळगावराजा 43, चिखली 45, मेहकर 34, मोताळा 39, जळगाव जामोद 46, संग्रामपूर 46 या तालुक्यांतील संख्या  मोठी आहे. या तुलनेत शेगाव 16, मलकापूर 7, नांदुरा 16, लोणार 16, संग्रामपूर 14 अशी आटोक्यात आहे.

उपचारादरम्यान गोपालनगर खामगाव येथील 37 वर्षीय पुरुष, पिंप्राळा (ता. खामगाव) येथील 29 वर्षीय पुरुष, आरेगाव (ता. मेहकर) येथील 63 वर्षीय पुरुष, सातगाव भुसारी (ता. चिखली) येथील 50 वर्षीय पुरुष, वरद (ता. नांदुरा) येथील 40 वर्षीय पुरुष, धनगरनगर शेगाव येथील 49 वर्षीय महिला व भादोला (ता. बुलडाणा) येथील 84 वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

5452 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’
प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 5943 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 5452 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून, 491 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 352 व रॅपीड टेस्टमधील 139 अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतून 1167 तर रॅपिड टेस्टमधील 4285 अहवालांचा समावेश आहे.

4539 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू

आज 504 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आजपर्यंत 461749 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 78613 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आज रोजी 2494 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 83732 कोरोनाबाधित रुग्ण असून, सध्या रुग्णालयात 4539 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत 580 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

Related Articles

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
Close
%d bloggers like this: