बुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

क्रिकेट प्रशिक्षकांचा असाही वाढदिवस; खेळाडूंनी क्रिकेट साहित्याने केली तुला

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः वाढदिवसानिमित्त धान्यतुला, पुस्तकतुला झाल्याचे यापूर्वी ऐकिवात, पाहण्यात होते. मात्र बुलडाण्यात क्रिकेट प्रशिक्षकांची क्रिकेटच्या साहित्याने तुला करण्यात आली. क्रिकेटच्या खेळात बुलडाण्याच्या भारत विद्यालयातील खेळाडूंनी राज्यात व देशातही नावलौकिक केला आहे. या खेळाडूंना प्रशिक्षण देण्याचे काम भारत विद्यालयातील क्रीडा शिक्षक संजय देवल यांनी केले आहे. आज, २१ ऑगस्ट रोजी भारत विद्यालयात एका कार्यक्रमात खेळाडूंनी क्रिकेटच्या साहित्याने तुला करून त्यांचा वाढदिवस साजरा केला. भारत विद्यालयातील ५०८ खेळाडू आजपर्यंत राज्यस्तरावर क्रिकेट स्पर्धा खेळले आहेत. ५० खेळाडू राष्ट्रीय स्तरावर क्रिकेट खेळले आहेत. ३ रणजी खेळाडू आहेत तर एका खेळाडूने आयपीएल स्पर्धाही गाजवली आहे.

Related Articles

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
Close
%d bloggers like this: