महाराष्ट्र

खडसे यांच्या चौकशीचा अहवाल मंत्रालयातून गहाळ

मुंबई : माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी व जावई गिरीश चाैधरी यांनी भोसरी एमआयडीसीत खरेदी केलेल्या जमीन घोटाळ्याप्रकरणाचा न्या. झोटींग समितीचा अहवाल मंत्रालयातून गहाळ झाल्यामुळे खळबळ उडाली आहे.

भोसरी एमआयडीसी जमीन घोटाळा प्रकरणाच्या चौकशीसाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी न्यायमूर्ती दिनकर झोटिंग यांची समिती नेमली होती. या समितीचा अहवाल जून 2017 मध्येच फडणवीस यांच्याकडे सादर करण्यात आला होता. अहवालात क्लिन चीट मिळाल्याचे खडसे सांगत होते. मागच्या सरकारच्या काळातील विधिमंडळाच्या अधिवेशनात हा अहवाल विधिमंडळाच्या पटलावर ठेवण्याची मागणी वारंवार करण्यात आली होती; परंतु तिच्याकडे फारसे लक्ष दिले गेले नाही. न्या. झोटिंग समितीच्या अहवालात नेमकं काय आहे, हे शोधण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्य सचिवांना विचारणा केली होती; परंतु हा अहवाल कुठेच सापडत नसल्याचं अधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्र्यांना कळवलं. त्यामुळे झोटिंग समितीचा अहवाल गेला कुठे? असा सवाल उपस्थित होत आहे. झोटिंग समितीचा गायब झालेला अहवाल आणि खडसे यांच्या मागे लागलेला ईडीचा ससेमिरा यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

Related Articles

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
Close