महाराष्ट्र

खबरदार, ऑफिसमध्ये टी-शर्ट घालून याल तर !

महाराष्ट्र सरकारची सरकारी कर्मचार्‍यांना तंबी
मुंबई :
सरकारदरबारी कधी कोणते फर्मान निघेल काही सांगता येत नाही. महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने सरकारी कर्मचार्‍यांसाठी नव्या मार्गदर्शक सूचना जारी करताना त्यांना ड्रेसकोडही दिला आहे.त्यानुसार त्यांना यापुढे टी-शर्ट घालून कार्यालयात येता येणार नाही. जीन्स पॅन्ट घालता येईल. पण त्यावर टी-शर्ट घालू नये, असे आदेशात म्हटले आहे. पुरुष कर्मचार्‍यांनी शक्यतो शर्ट, पॅन्ट/ट्राऊझर असा पोषाख घालावा, डार्क किंवा भडक रंगाचे,चित्रविचित्र नक्षीकाम, गडद डिझाईन असलेले कपडे वापरू नयेत, कार्यालयात जीन्स पॅन्ट व टीशर्ट असा वापर करू नये, आदी सूचना जारी करण्यात आल्या असून त्याचे पालन सर्व शासकीय कर्मचार्‍यांना करावे लागणार आहे.तर महिलांसाठी साडी, सलवार/ चुडीदार, ट्राऊझर पॅन्ट व त्यावर कुर्ता अथवा शर्ट वापरण्याची मुभा देण्यात आली आहे. शिवाय आवश्यकतेनुसार ओढणी/ दुपट्टाही त्यांना वापरता येईल. हा ड्रेसकोड कंत्राटी कर्मचार्‍यांनाही लागू असेल. पायात कोणत्या प्रकारचे वाहन वापरावे हेही यात सांगण्यात आले आहे. महिला व पुरुषांना बुट, सँडल वापरता येईल. सार्वजनिक ठिकाणी ड्रेसकोडवरून बर्‍याचवेळा वादंग उठले आहे. मध्यंतरी शिर्डी देवस्थान समितीने भाविकांना ड्रेसकोड लागू केल्यानंतर त्यावरून वाद झाला होता. शिवाय दोन दिवसांपूर्वी गुजरात विधानसभेत टी-शर्ट घालून आलेल्या आमदाराला मार्शलकरवी बाहेर काढण्यात आले होते.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: