बुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

खबरदार खोट्या पोस्‍ट शेअर कराल तर..!; ‘ती’ पोस्‍टही जिल्हाधिकारी कार्यालयाकडून नाहीच!!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः कालपासून जिल्ह्यात सोशल मीडियावर लवकरच कोरोना तिसऱ्या स्टेजला पोहोचणार असून, सर्वांनी अतिदक्षता पाळण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्‍या सूचना असा संदेश फिरत आहे. असा कुठलाही संदेश जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रसारित करण्यात आलेला नाही. ती पोस्ट जिल्हा माहिती कार्यालयाकडूनही प्रसारित करण्यात आलेली नाही.

कुणीही जिल्हा माहिती कार्यालयाच्या नावाने अशी पोस्ट प्रसारित करू नये. कुणीही अफवा, खोटी माहिती प्रसारित करीत असल्याचे निदर्शनास आल्यास दोषींवर साथरोग अधिनियम, आपत्ती व्यवस्थापन कायद्या अंतर्गत कारवाई करण्यात येईल. प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे अधिकृतरीत्या जिल्हा माहिती कार्यालय प्रसारण करते. नागरिकांनी अशा कुठल्याही अफवा, खोटी माहितीवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे. नागरिकांनी कोरोना संसर्गापासून वाचण्यासाठी मास्क वापरावा, हात वारंवार स्वच्छ धुवावे किंवा सॅनिटाइज करावे, सामाजिक सुरक्षा अंतराचे पालन करावे किंवा गर्दीत जाणे टाळावे आदींचे पालन करावे, असे आवाहनही जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: