बुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

खबरदार! विना मास्क फिराल तर…. पोलीस- पालिका कर्मचारी पथकांची पुन्हा ‘फिर वही दंड लाया हूँ’ पॉलिसी!!

बुलडाणा (संजय मोहिते ः विशेष प्रतिनिधी)ः 22 मार्चपासून लावण्यात आलेल्या कडक लॉकडाऊनचा काळ, भरलेला दंड वा खाल्लेले दंडुके ( बोलणे) , घराबाहेर पडताना वापरावा लागणारा गनिमी कावा याचा कटू अनुभव असणारे बुलडाणा शहरवासीवरील शीर्षकाने अजिबातच बावचळून जाणार नाहीये! ते बरोबर समजून घेतील की कोरोनामुळे एकाचवेळी ‘ फिर वही दिन लाया हूँ आणि ‘फिर वही दंड लाया हूँ’ चे दिवस परतलेय!

जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारणचे अध्यक्ष या नात्याने बुलडाणा शहरासह जिल्ह्यात संचारबंदी लागू केली. तसेच मास्क घालणे व सुरक्षित अंतराचे पालन न करणाऱ्या विरुद्ध दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश नगरपरिषद मुख्याधिकारी व पोलीस अधीक्षकांना दिले. या पार्श्वभूमीवर कोरोना योद्धा ठरलेले बुलडाणा पालिकेचे मुख्याधिकारी महेश वाघमोडे यांनी पालिका कर्मचाऱ्यांची 3 पथके गठीत केली. आज 17 फेब्रुवारीच्‍या सकाळीच पालिका कर्मचारी व पोलीस दादा यांनी शहर पोलीस स्टेशनसमोर ठिय्या धरीत विना मास्क धारक वाहनचालक व पादचारी यांना दंड ठोठावणे सुरू केले. दुसरे पथक जिल्हाधिकारी कार्यालया नजीकच्या एसबीआय चौकात ठाण मांडून बसले. दुपारपर्यंत बेजबाबदार नागरिकांकडून प्रत्येकी 500 रुपये प्रमाणे मोठ्या प्रमाणावर दंड वसूल करण्यात आला. याशिवाय भर वाहतुकीच्या भागात देखील दंडात्मक कारवाई करण्यात आली. एसबीआय चौकात येथे दसुरखुद्ध जिल्हाधिकारी एस. रामामुर्ती, तहसीलदार रुपेश खंडारे, मुख्याधिकारी महेश वाघमोडे यांनी भेट दिली.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: