क्राईम डायरीमुख्य बातम्या

खळबळजनक… नांदुरा शहरातून 12 वर्षीय मुलाचे अपहरण!

नांदुरा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः दुकानात रंग आणण्यासाठी गेलेल्या 12 वर्षीय मुलाचे अपहरण झाल्याने नांदुरा शहरात खळबळ उडाली आहे. मुलाच्या वडिलांनी काल, 8 एप्रिलला सायंकाळी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. रात्री उशिरा या प्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

विनायक पंढरी इंगळे (38, रा. पंचवटी, नांदुरा) शहरात भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतात. काल सकाळच्या सुमारास ते घरातील कुलरला रंग देत होते. त्यावेळी त्यांचा 12 वर्षीय मुलगा प्रशांत याला रंग आणण्यासाठी त्‍यांनी दुकानात पाठवले. मात्र बराच वेळ होऊनही तो परतला नाही. त्याचा सर्वत्र शोध घेऊनही तो मिळून न आल्याने रात्री वडिलांनी अज्ञात व्यक्तीने मुलाचे अपहरण केल्याची तक्रार नांदुरा पोलीस ठाण्यात दिली. तक्रारीवरून पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: