क्राईम डायरीमुख्य बातम्या

खळबळजनक…13 वर्षीय विद्यार्थिनी शाळेसाठी निघाली, पण शाळेत पोहोचलीच नाही!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सातवीतील 13 वर्षीय चिमुकली शाळेत जाण्यासाठी निघाली असता मध्येच बेपत्ता झाली. ही घटना देऊळगाव मही (ता. देऊळगाव राजा) येथे आज, 13 फेब्रुवारीच्या सकाळी समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. रुपाली हरिदास शिंदे (रा. देऊळगाव मही) असे या मुलीचे नाव असून, ती श्री शिवाजी विद्यालयाची विद्यार्थिनी आहे.
आज सकाळी 7:30 वाजता रुपाली मैत्रिणीसोबत शाळेत जायला निघाली होती. शाळा सुटल्यानंतर ती घरी न परतल्याने तिच्या घरच्यांनी शाळेत जाऊन चौकशी केली असता ती शाळेत आलीच नव्हती, असे कळले. दरम्यान तिच्या मैत्रिणीजवळ चौकशी केली असता तिच्या मैत्रिणी रस्त्याच्या बाजूला दुकानात गेल्या असताना चिखली- देऊळगाव राजा रोडवर उभ्या असलेली रुपाली शाळेत जातेवेळीच गायब झाल्याचे तिच्या मैत्रिणींनी सांगितले. यासंदर्भात देऊळगाव मही येथील पोलीस चौकीत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: