जिल्ह्याचं राजकारणबुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

खामगावचे आमदार ॲड. फुंडकर प्रचाराला गेले, त्‍या उमेदवाराचे पुढे काय झाले?

बुलडाणा (मनोज सांगळे ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः खामगावचे आमदार ॲड. आकाश फुंडकर यांना पश्चिम बंगालमध्ये भाजपाचे उमेदवार सिद्धार्थ नस्‍कर (Sidhartha Shankar Naskar) यांच्‍या प्रचाराच्‍या नियोजनासाठी पक्षश्रेष्ठींनी पाठवले होते. पण हा उमेदवार जिंकवण्यात ॲड. फुंडकर कमी पडल्‍याचे समोर आले आहे. विशेष म्‍हणजे या मतदारसंघात 98 टक्‍के हिंदू मतदान आहे. असे असतानाही नस्‍कर यांच्‍या पराभवाचे वाटेकरी फुंडकर ठरले असेच म्‍हणावे लागेल.

महाराष्ट्र व गोवा राज्याचे संघटन मंत्री विजय पुराणिक यांनी महाराष्ट्रातील आमदारांना पश्चिम बंगालमधील काही मतदारसंघांची जबाबदारी दिली होती. यात नवदीप मतदारसंघात उमेदवाराच्‍या प्रचाराचे आणि त्‍यादृष्टीने नियोजनाची जबाबदार ॲड. फुडकरांवर आली होती. मात्र ज्‍या उमेदवारासाठी फुंडकरांनी मेळावे घेतले, विजयासाठी नियोजन केले, त्‍या उमेदवाराला मतदारांनी नाकारले आहे. टीएमसीचा उमेदवार (Pundarikakshya Saha) या ठिकाणी विजयी झाला आहे. फुंडकरांची जादू त्‍या ठिकाणी चालली नाही की पक्षश्रेष्ठींनी तिथे प्रचारसाठी योग्‍य नेता पाठवला नाही, यावर आता चर्चा होताना दिसते. कारण हिंदू वोटिंग एवढे असूनही तिथे भाजपा उमेदवार हरला असेल तर त्‍या मतदारसंघाची जबाबदारी ज्‍यांच्‍याकडे सोपवली तो नेता कमी पडला, अशी चर्चा आता होत आहे. या उमेदवाराच्‍या प्रचारासाठी ॲड. फुंडकर ज्‍या त्‍वेषाने-आवेशाने गेले, तो आवेश या पराभवाबरोबरच गळून पडल्‍याचीही कुजबूज आता कार्यकर्त्यांत सुरू झाली आहे. तिथल्या सभांचे व्हिडिओ, बातम्‍या बुलडाणा जिल्ह्यातही फुंडकरांनी छापून आणल्‍या होत्‍या. पण नंतर त्‍या उमेदवाराचे काय झाले हे कुणीच सांगितले नाही.

उमेदवारच बरोबर नव्‍हता का?

हिंदूबहुल आहे म्‍हणून भाजपाचा उमेदवारच निवडून येईल असे म्‍हणता येणार नाही. त्‍यासाठी योग्‍य उमेदवारही हवा असतो. भाजपाने उमेदवार दिलेले नस्‍कर पदवीधरही नाहीत. शिवाय त्‍यांच्‍यावर गुन्‍हेही दाखल आहेत. कदाचित त्‍यामुळेही फुंडकर या नेत्‍याला विजयश्री घालू शकले नसतील, अशीही शक्‍यता नाकारता येत नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
Close
%d bloggers like this: