क्राईम डायरीमुख्य बातम्या

खामगावमध्ये पुन्‍हा आयपीएलवर सट्टेबाजी!; कल्‍पेश बजाजला अटक

खामगाव (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः आयपीएल सामन्यावर सट्टेबाजीचा आणखी एक प्रकार खामगावमध्ये समोर आला असून, शहर पोलिसांनी काल, 22 एप्रिलला वामननगरातून कल्‍पेश बजाज याला ताब्‍यात घेतले आहे. त्‍याचा साथीदार पसार होण्यात यशस्वी झाला. घटनास्‍थळावरून 1 लाख 36 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

मिळालेल्या गोपनीय माहितीवरून वामननगरातील अमरसिंह ठाकूर याच्‍या घरी शहर पोलिसांनी छापा मारला. राजस्‍थान रॉयल विरुद्ध रॉयल चॅलेंजर बंगळुरू या सामन्‍यावर कल्‍पेश बजाज (रा. सिंधी कँप) हा ऑनलाइन सट्टा लावत होता. त्‍याला ताब्‍यात घेण्यात आले. टीव्‍ही, मोबाइलसह एकूण 1 लाख 36  हजार 645 रुपयांचा माल जप्‍त करण्यात आला. शहर पोलिसांनी ठाकूर व बजाज यांच्‍याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्‍हा दाखल केला आहे.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: