क्राईम डायरी

खामगावातून गायब झालेला ट्रक आढळला सिंदखेड राजात!

खामगाव (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः 18 फेब्रुवारी रोजी खामगाव शहरातील मेहबूबनगर भागातून चोरी गेलेला ट्रक सिंदखेडराजा येथे बेवारस स्थितीत सापडला आहे. खामगाव शहर पोलिसांनी एका धाब्यावर बेवारस सापडलेल्या या ट्रकला शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आले आहे.

महेश रामगोपाल शर्मा (रा. खामगाव) यांनी त्यांचा ट्रक शाबीर शाह (रा. मेहबूबनगर) खामगाव यांना वाहतुकीकरिता चालविण्यासाठी भाड्याने दिला होता. शाह हे 16 फेब्रुवारी रोजी ट्रक (क्र एम.एच. 31 ए.पी. 56) घरासमोर उभा करून सहपरिवार  बाहेरगावी गेले होते. 18 फेब्रुवारी रोजी ते गावावरून परत आले असता त्यांना ट्रक गायब झाल्याचे दिसले. सर्वत्र शोधाशोध करूनही त्यांना ट्रक न सापडल्याने  ट्रकमालक महेश शर्मा यांनी  खामगाव शहर पोलीस ठाण्यात ट्रक चोरी झाल्याची तक्रार दिली होती.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: