क्राईम डायरीमुख्य बातम्या

खामगावात जुगार अड्ड्यावर छापा; सहा जुगाऱ्यांना अटक; सव्वा लाखाचा मुद्देमाल जप्त

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : खामगाव ग्रामीण पोलिसांनी जुगार अड्ड्यावर छापा मारून सहा जुगाऱ्यांना ताब्यात घेतले. ही कारवाई काल, २५ जुलै रोजी सायंकाळी रोहणा शिवारात (ता. खामगाव) करण्यात आली. संतोष देविदास खंडारे, पुंडलिक दत्तू रोठे, संजय ऊर्फ कैलास तुकाराम डांगे, संतोष रामभाऊ तायडे, एकनाथ पुरुषोत्तम आमले, कैलास काशिनाथ वावगे (सर्व रा. रोहणा, ता. खामगाव) अशी पकडण्यात आलेल्या जुगाऱ्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून चार मोटारसायकली व रोख ७३५० रुपये असा एकूण १ लाख २७ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Related Articles

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
Close
%d bloggers like this: