क्राईम डायरीमुख्य बातम्या

खामगावात वकिलाची, चिखलीत महापारेषण कर्मचाऱ्याची दुचाकी लांबवली!

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः खामगाव न्यायालय परिसरातून वकिलाची मोटारसायकल चोरट्याने लांबवली. ही घटना ९ ऑगस्‍टला दुपारी दोनच्‍या सुमारास घडली. बराच शोध घेतल्यानंतर ॲड. नीलेश चांडक (रा. बालाजी प्लॉट खामगाव) यांनी काल, १५ ऑगस्‍टला खामगाव शहर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. एमएच 28 एयू 6110 क्रमांकाची सुझुकी कंपनीची ॲक्सेस मोपेड (किंमत अंदाजे 30 हजार रुपये) उभी करून ॲड. चांडक कामानिमित्त कोर्टात गेले. त्यांचे कामकाज पूर्ण करून परत त्या ठिकाणी आले असता मोपेड दिसून आली नाही. त्यांनी इतरत्र शोध घेतला पण ती मिळाली नाही. अखेर 15 ऑगस्टला संध्याकाळी त्यांनी पोलिस स्टेशनला तक्रार दिली. तपास एनपीसी मनोहर गोरे करत आहेत.

चिखलीतही दुचाकी चोरी
सचिन महादेवराव मंगलकर (४०, रा. महापारेषण कंपनी शासकीय निवासस्थान साकेगाव रोड चिखली) यांनी चिखली पोलीस स्टेशनला तक्रार दिली, की १३ ऑगस्‍टला दुपारी १२ च्‍या सुमारास त्‍यांनी त्‍यांची हिरोहोंडा स्प्लेंडर प्लस मोटारसायकल (क्र. MH 28-Q-1409) चिखली शहरातील जयस्तंभ चौकातील प्रसन्‍न रेडिमेडसमोर उभी केली होती. त्‍यानंतर ते बाजारात निघून गेले. बाजार करून दीडला परतले असता मोटारसायकल दिसून आली नाही. आजूबाजूला शोध घेतला असता मिळून आली नाही. १० हजार रुपयांची मोटारसायकल चोरीस गेल्याचे तक्रारीत म्‍हटले आहे.

Related Articles

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
Close
%d bloggers like this: