क्राईम डायरी

खामगाव तालुक्यातही चोर बनले सव्वाशेर!; लाखाची घरफोडी!!

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः खामगावजवळील जनुना येथे चोरट्यांनी घर फोडून 1 लाखाचा ऐवज लंपास केला आहे. ही घटना 9 फेब्रुवारीच्या मध्यरात्रीनंतर घडली. शेख इजाज शेख अन्वर यांच्या घरात ही चोरी झाली आहे. चोरट्यांनी 50 हजार रुपये रोख, सोन्या-चांदीचे दागिने असा 95 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. शेख इजाज यांच्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: