क्राईम डायरीमुख्य बातम्या

खामगाव, बुलडाण्यातून पाच जण बेपत्ता, एका तरुणीचा समावेश

बुलडाणा/खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः खामगाव तालुक्‍यातून तिघे व बुलडाणा शहरातील दोघे बेपत्ता झाल्याच्‍या नोंदी पिंपळगाव राजा, खामगाव शहर आणि बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात झाल्या आहेत.

खामगावातील पत्रकार भवनजवळील रहिवासी ३९ वर्षीय शेख शाहीद शेख लुकमान हा युवक घरी कुणाला काही न सांगता निघून गेला आहे. बुलडाणा शहरातील शांतिनिकेतननगर, सागवन येथील १८ वर्षीय फाल्गुनी राजेंद्र देव्‍हरे ही तरुणी बेपत्ता झाली आहे. तिचा शोध घेऊनही मिळून न आल्याने बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली. बुलडाणा शहरातील मिलिंदनगर येथील गजेंद्र रमेश नरवाडे हा २३ वर्षीय तरुणही बेपत्ता झाला असून, त्‍याचाही शोध बुलडाणा शहर पोलीस घेत आहेत.

घाणेगाव (ता. खामगाव) येथून सौ. अनुसया दिनेश जंजयकार (३०) ही विवाहिता तीन वर्षीय सुपेश या चिमुकल्यासह बेपत्ता झाली आहे. पुंडलिक रामभाऊ बेलोकार (रा. घाणेगाव) यांनी पिंपळगाव राजा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. सौ. अनुसया ही त्‍यांच्‍या साल्याची पत्नी असून, तिला लहान मुलासह घाणेगाव येथून दवाखान्यात उपचारासाठी नांदुऱ्याला जाण्यासाठी त्‍यांनी अॉटोत बसवून दिले होते. नांदुरा पोहोचल्यावर तिने फोन करून सांगितले, की दवाखाना करून घरी येतो. मात्र ती परतलीच नाही. १४ ऑगस्‍टपासून ती बेपत्ता असून, बराच शोध घेतल्यानंतर अखेर आज, १७ ऑगस्‍टला या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. तपास एएसआय विजय महाले करत आहेत. सौ. अनुसयाचा रंग सावळा, उंची ४ फूट ६ इंच, बांधा सडपातळ, केस काळे, नाक चापट, कपडे काॅफी रंगाची साडी, पायात चप्पल असे तिचे वर्णन आहे.

Related Articles

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
Close