क्राईम डायरीमुख्य बातम्या

खामगाव शहरातून दोघे रहस्‍यमयरित्या गायब, एकाचा मृतदेह आढळला

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः खामगाव शहरातून दोघे रहस्‍यमयरित्‍या गायब झाले आहेत. दोन्‍ही घटना वेगवेगळ्या असून, एका घटनेतील बेपत्ता व्‍यक्‍तीचा मृतदेह विहिरीत आढळल्याने खळबळ उडाली आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुरुषोत्तम ऊर्फ सागर कैलास दळवी (26, रा. घाटपुरी) हा 28 फेब्रुवारीला सकाळी 10 ला दूध डेअरीवर जातो म्हणून घराबाहेर पडला. तो अद्याप परतलेला नाही. त्‍याच्‍या मोबाइलवर कॉल केला असता उचलत नाही. मित्र, नातेवाईकांकडे त्‍याला खूप शोधले पण तो मिळून आला नाही. अखेर आज 2 मार्चला त्‍याचे वडील कैलास श्रीराम दळवी यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दिली आहे. तपास  ना.पो.काँ. श्री. राजपूत करत आहेत.

दुसऱ्या घटनेत ज्ञानेश्वर अशोक देशमुख (40, रा. गोपाळनगर खामगाव) हे 1 मार्चला सकाळी 10 च्या सुमारास घरातून बाहेर गेले. नंतर परतलेच नाहीत. घरच्यांनी नातेवाईकांकडे व इतरत्र शोध घेतला. मात्र ते मिळून आले नव्‍हते. काल 1 मार्चला संध्याकाळी 5.45 वाजताच्या सुमारास त्‍यांचा मृतदेह नगरपरिषदेच्‍या सार्वजनिक विहिरीत आढळला. या प्रकरणी तपास शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पीएसआय संजय अवचिते करत आहेत.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: