देश-विदेश

गँगरेप झालेल्या पीडितेची विष पिऊन आत्महत्या

उत्तर प्रदेशातील माणुसकीला काळीमा फासणारी घटना
दोन तरुणांच्या मुसक्या आवळल्या; दोघे फरार

मेरठ : महिला व मुली कोणत्याच राज्यात सुरक्षित राहिलेल्या नाहीत.याची प्रचिती विविध घटनांमधून येत असते. उत्तर प्रदेशात अशीच एक घटना घडली असून मेरठ जिल्ह्यात खासगी ट्यूशन संपवून घरी परतणार्‍या एका दहावीतील मुलीला पळवून नेऊन चार तरुणांनी तिच्यावर गँगरेप केला. हा मानसिक व शारीरिक आघात सहन न झाल्याने त्या पीडित मुलीने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. या घटनेनंतर राज्यात संतापाची लाट उसळली आहे. पोलिसांनी याप्रकरणी दोन तरुणांना अटक केली असून दोन आरोपी फरार आहेत.
उत्तर प्रदेशात सरधना पोलीस ठाण्याच्या हद्दीत कपसड गावात दहावीची ट्यूशन संपवून घरी परतणार्‍या गुरुवारी युवतीवर गावातीलच चार तरुणांनी गँगरेप केला. प्रचंड भेदरलेल्या अवस्थेत मुलगी गंभीर जखमी होऊन घरी परतली. घरी येताच तिने विषारी औषध प्राशन केले. ही बाब लक्षात येताच घरच्यांनी तिला रुग्णालयात दाखल केले. पण तेथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. पोलिसांना पीडितेने लिहिलेले सुसाईड नोट सापडली असून त्याआधारे लखन आणि विकास या दोन दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर आणखी दोन आरोपी फरार आहेत.त्यांचा कसून शोध घेतला जात असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्ष केशवकुमार यांनी सांगितले.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: