क्राईम डायरीमुख्य बातम्या

गायकवाड आजोबा फसले… तुम्‍ही तरी फसू नका… वाचा भामट्याने त्‍यांना कसं बनवलं!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः हातचलाखी करून 80 वर्षीय वृद्धाची अंगठी लांबविल्याची घटना काल,  4 एप्रिल रोजी बुलडाणा शहरात घडली. याप्रकरणी अज्ञात व्यक्‍तीविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

शहरातील महावीरनगरातील रहिवासी तोलाजी शंकर गायकवाड डोळे तपासणीसाठी चिंचोले नेत्र रुग्णालयात गेले होते. तेथून चवरे नेत्र रुग्णालयात जात असताना सकाळी 10 च्या सुमारास सार्वजनिक बांधकाम उपअभियंता यांच्या बंगल्याजवळ दुचाकीस्वाराने त्यांना थांबवले. तुमची अंगठी पडून जाईल. रुमाल द्या. मी अंगठी बांधून देतो, असे त्या दुचाकीस्वाराने वृद्धाला म्हटले. हातचलाखी करत त्याने अंगठी रुमालात बांधलीच नाही व केवळ गाठ मारून रुमाल वृद्धाजवळ देऊन तो पसार झाला. घरी आल्यानंतर त्यांनी रुमाल बघितला असता त्यांना अंगठी न दिसल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आले. याप्रकरणी त्यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: