क्राईम डायरी

गावातच घर फोडले, वेणीत युवकाला अटक, दागिने दिले काढून

मेहकर (विष्णू आखरे पाटील) ः वेणी (ता. लोणार) येथील दागिने चोरास मेहकर पोलिसांनी काल, 8 फेब्रुवारीला गावातूनच शिताफीने अटक केली.
वेणी येथील गजानन मारुती खराटे यांच्या राहत्या घरातून चोरट्याने 10 ग्रॅम सोन्याची एकदाणी, व साडेसात ग्रॅमचे कानातील एकूण 55 हजारांचे दागिने लंपास केले होते. खराटे यांनी मेहकर पोलीस स्टेशनला चोरीची तक्रार दिली. पोलिसांनी गावातील अमोल गोविंद देशमुख (35) याची संशयावरून चौकशी केली असता त्याने दागिने चोरल्याची कबुली दिली. यावरून अमोलविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्याच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई कर्तृव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार आत्माराम प्रधान, पोलीस हेडकॉन्स्टेबल नारायण मांटे, नायक पोलीस कॉन्स्टेबल भास्कर सानप, गणेश लोढे यांनी केली.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: