खामगाव (घाटाखाली)

गुणवंत खेळाडूंना मिळणार शासनाकडून पेन्शन

खामगाव (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा)  ः भारत सरकार युवा आणि क्रीडा मंत्रालयाच्‍या निर्णयानुसार गुणवंत खेळाडूंकरिता क्रीडा पेन्शनसाठी सुरक्षा पूर्ववत करणे, सक्रीय क्रीडा करिअरमधून अतिरिक्त आर्थिक सेवानिवृत्ती प्रदान करणे ही एक महत्वाची योजना आहे. त्यानुसार गुणवंत खेळाडूंना पेन्शन मिळणार आहे.

ऑलिम्पिक, कॉमनवेल्थ गेम्स, एशियन गेम्स आणि ऑलिम्पिक गेम्समध्ये विश्वचषक स्पर्धेतील विशिष्ट उत्कृष्ट कामगिरी केलेल्या खेळाडूंना प्रामुख्याने मदत करणे हा या योजनेचा हेतू आहे.  या योजनेसाठी   अर्जदार खेळाडू भारताचा रहिवाशी असावा व त्याने ऑलिम्पिक, पॅरा ऑलिम्पिक गेम्स, कॉमनवेल्थ गेम्स, एशियन गेम्स व वर्ल्ड कप (ऑलिम्पिक व एशियन गेम्स स्पर्धेत समाविष्ट खेळप्रकार) या स्पर्धेत सुवर्ण, रौप्य व कास्य पदक प्राप्त केलेले असावे.  या स्पर्धेतील प्राविण्य प्राप्त , गुणवंत खेळाडूस मासिक मानधन देण्याची तरतूद केली आहे.  तसेच पेंशन 30 वर्षांपासून (किंवा सक्रिय क्रीडा पासून सेवानिवृत्तीची तारीख, जे नंतर असेल) मिळणाऱ्या खेळाडूवर देय असेल आणि खेळाडूच्या आयुष्यादरम्यान कायम राहील. परंतु अशी पेन्शन लागु करताना खेळाडू सक्रिय क्रीडा करिअरमधून निवृत्त झाले असतील. दर चार वर्षांनी आयोजित होणाऱ्या विश्वचषक, विश्व अजिंक्यपद स्पर्धांकरिता योजना लागू राहील. याबाबत संबंधित पात्र खेळाडूंनी आवश्यक त्या कागदपत्रांसह प्रस्ताव केंद्र शासनास सादर करावयाचा असून, विहीत नमुन्यातील अर्जावर संबंधित खेळाच्या राष्ट्रीय खेळ संघटनेचे अध्यक्ष, सचिव यांची स्वाक्षरी किंवा उपसचिव, आयुक्त, क्रीडा व युवक सेवा यांचे स्वाक्षरीसह प्रस्ताव सादर करावायाचा आहे.  याबाबत अधिक माहिती https://www.yas.nic.in/…/scheme-sports-fund-pension या लिंकवर उपलब्ध आहे. राज्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन राज्याचे क्रीडा विभागाचे आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी केले आहे.

असे राहणार दरमहा पेन्शन

ऑलिम्पिक / पॅरा ऑलिम्पिक गेम्स प्राविण्यधारक –  दरमहा 20,000 रुपये, सुवर्ण पदक विश्वचषक / विश्व अजिंक्यपद स्पर्धा (ऑलिम्पिक व एशियन गेम्स स्पर्धात समाविष्ट असलेले खेळ प्रकार) – 16,000 रुपये, रौप्य व कास्य पदक विश्वचषक स्पर्धा (ऑलिम्पिक व एशियन गेम्स स्पर्धात समाविष्ट असलेले खेळ प्रकार) – 14,000 रुपये, सुवर्ण पदक-कॉमनवेल्थ गेम्स, एशियन गेम्स, पॅरा एशियन गेम्स – 14,000 रुपये, रौप्य व कास्य पदक-कॉमनवेल्थ गेम्स, एशियन गेम्स, पॅरा एशियन गेम्स – 12,000 रुपये.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: