क्राईम डायरीमुख्य बातम्या

गॅस कटरच्‍या साह्याने जिल्ह्यात ३ एटीएम फोडले, ५५ लाख रुपयांची रोख लांबवली!; तीन चोरटे सीसीटीव्‍हीत कैद!!

बुलडाणा/खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः गॅस कटरच्‍या साह्याने तीन एटीएम फोडून चोरट्यांनी खळबळ उडवली आहे. शेलूदच्या (ता. चिखली) एटीएममधून २७ लाख २१ हजार, उंद्रीच्‍या एटीएममधून ९ लाख आणि पळशी बुद्रूक (ता. खामगाव) येथील एटीएममधून १९ लाख रुपये चोरट्यांनी लंपास केले. तीन चोरट्यांनी आज, ३० जुलैच्‍या पहाटे दीडच्‍या सुमारास (मध्यरात्री) हा कारनामा केला. आज सकाळी शेलूदच्या स्‍टेट बँकेचे कॅशियर बँकेत आले असता त्‍यांना बाजूचे एटीएम फोडलेले दिसले. त्‍यानंतर उंद्री आणि पळशीचेही एटीएम चोरट्यांनी अशाच पद्धतीने फोडल्याचे समोर आले.

शेलूद येथील भारतीय स्‍टेट बँकेच्या बाजूला एटीएम आहे. तीन चोरटे चेहरा बांधून आले तेव्‍हा एटीएमचे शटर बंद होते. चोरट्यांनी गॅस कटरने शटर तोडले. त्‍याआधी सीसीटीव्‍ही कॅमेऱ्याच्या वायरही तोडून टाकल्या. नंतर एटीएम गॅस कटरने फोडले व त्‍यातून २७ लाख २१ हजार रुपयांची रोखरक्‍कम गायब केली. आज सकाळी बँकेचे कॅशियर अनिल सूरडकर बँकेत आले असता त्‍यांना एटीएम फोडल्याचे दिसून आले. त्‍यांनी तातडीने चिखली पोलिसांना कळवले. घटनास्‍थळी उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यमावार, बुलडाणा स्‍थानिक गुन्‍हे शाखेचे निरिक्षक बळीराम गिते, चिखलीचे ठाणेदार गुलाबराव वाघ यांनी सहकाऱ्यांसह भेट दिली. जिल्ह्यात आणखी दोन एटीएमही अशाच पद्धतीने फोडण्यात आले असून, उंद्री येथील एटीएममधून ९ लाख आणि पळशी बुद्रूकच्‍या एटीएममधून १९ लाख रुपयांची चोरी झाली आहे. एकूण ही रक्‍कम ५५ लाखांच्‍या घरात जाते.

Related Articles

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
Close
%d bloggers like this: