थोडक्यात जिल्हा

गेलडा व राका परिवारातर्फे लोणारमध्ये रक्तदान शिबिर

लोणार (प्रेम सिंगी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः लोणार येथे 12 फेब्रुवारीला स्वर्गीय पुनमचंद गेलडा यांचे नववे पुण्यस्मरण व स्वर्गीय अशोक राका यांच्या चतुर्थ पुण्य स्मरणानिमित्त शुगर तपासणी आणि रक्तदान शिबिर घेण्यात आले.
शिबिराला शहरातील तथा ग्रामीण भागातील जनतेच्या उत्तम प्रतिसाद मिळाला. कोरोनामुळे रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याने आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महाराष्ट्रातील जनतेला रक्तदान करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद म्हणून रक्तदान शिबिर पार पडले. यावेळी 121 जणांनी रक्तदान केले. शिबिराला बुलडाण्याचे पालकमंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी भेट देऊन रक्तदाते आणि आयोजकांचे कौतुक केले. शिबिराला यशस्वी करण्यासाठी गेलडा आणि राका परिवार तसेच मित्र मंडळाने परिश्रम घेतले. औरंगाबादवरून आलेल्या दत्ताजी भाले रक्तपेढीने रक्तसंकलन करून दोन्ही परिवारांना आभार पत्र देत त्यांचे आभार मानले.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: