बुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

गोठ्यावर वीज पडून तीन गुरांचा जागीच मृत्यू; चिखली तालुक्यातील घटना

चिखली (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा)  ः गोठ्यावर वीज पडून तीन गुरांचा जागीच होरपळून मृत्यू झाला. ही घटना आज, 28 एप्रिलच्‍या पहाटे 1 च्या सुमारास धोत्रा भणगोजी (ता. चिखली) येथे घडली.

चिखली तालुक्यात वादळी वाऱ्यासह विजांचा गडगडाट होत होता. धोत्रा भणगोजी येथील शेतकरी दगडूबा विठोबा अक्कर यांच्या शेतातील गोठ्यावर वीज पडली. यात दोन मोठे बैल व एका गीरगायीचा जागीच मृत्यू झाला, तर एक गीरगाय गंभीर जखमी झाली. यात शेतकऱ्याचे दोन लक्ष रुपयांचे नुकसान झाले.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: