बुलडाणा (घाटावर)

ग्रामपंचायत कर्मचार्‍यांची दुसरबीड येथे आढावा बैठक

सिंदखेड राजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियनतर्फे सिंदखेड राजा तालुक्यातील दुसरबीड येथे तालुका बैठक घेण्यात आली.

नारायणराव नागरे महाविद्यालयात झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी राज्य अध्यक्ष विलास कुमरवार होते. राज्य सरचिटणीस गिरीश दाभाडकर, काजी अल्लाउद्दीन, रामेश्‍वर गायके, यशवंत इंगळे, रामेश्‍वर देवरे, अशोक बुरकुल, भाऊ गायकवाड, कैलास झिने यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामसेवक मोठ्या संख्येने हजर होते. यावेळी तालुकाध्यक्षपदी किसन अवसरमोल, उपाध्यक्ष भीमराव राठोड, सचिवपदी भरत सुपेकर यांची निवड करण्यात आली. बैठकीचे आयोजन जिल्हा सचिव भरत सुपेकर यांनी केले होते. सूत्रसंचालन विनोद सातपुते यांनी केले.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: