क्राईम डायरीमुख्य बातम्या

घरचे सर्व दिंडीत गेले होते अन्‌ पती शेतात… तिने उचलले टोकाचे पाऊल!; बुलडाणा तालुक्‍यातील घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः ३२ वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल, २० जुलैला चिखला (ता. बुलडाणा येथे) सायंकाळी साडेसातच्‍या सुमारास समोर आली. ज्योती गैबीनेद नागरे (रा. चिखला) असे या महिलेचे नाव आहे.

काल सायंकाळी गावात आषाढी एकादशी निमित्ताने चिखला गावात दिंडी सुरू होती.त्यामुळे घरातील लोक गावातील दिंडीत गेले होते.ज्योती यांचे पती शेतात गेले होते. सायंकाळी त्या घरी एकट्याच होत्या. घरातील लहान बाळासाठी बांधलेल्या झोक्याला ज्योतीने गळफास घेतला. दिंडीतून घरी आलेल्यांना ते दृश्य दिसताच त्यांनी एकच हंबरडा फोडला. घटनेची माहिती बुलडाणा ग्रामीण पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. ज्योती यांना एक मुलगा व एक मुलगी आहे. वृत्त लिहीपर्यंत आत्महत्येचे कारण कळू शकले नाही.

Related Articles

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
Close
%d bloggers like this: