क्राईम डायरी

घरफोडीतील आरोपीच्या आवळल्या मुसक्या

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः घरफोडीच्या गुन्ह्यात फरारी असलेल्या आरोपीच्या मुसक्या आवळण्यात बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. दीपक उर्फ भुर्‍या दगडू देशमुख (25, रा. वीर लहुजीनगर, जुना गाव, बुलडाणा) असे आरोपीचे नाव आहे. गुप्त बातमीदाराने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी वीर लहुजीनगरात जाऊन त्यास ताब्यात घेतले. ही कारवाई पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अप्पर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक बळीराम गिते, नापोकाँ सुनील खरात, दीपक पवार, पोकाँ गणेश शेळके, संजय म्हस्के, गजानन गोरले, वैभव मगर यांनी केली.

जॉन लेआऊटमध्ये फोडले होते घर
बुलडाणा शहरातील जॉन ले आउटमध्ये राहणार्‍या सुनीता देशपांडे यांचे घर 31 जुलै 2020 च्या रात्री फोडण्यात आले होते. त्यांच्या घरातून 10 हजार रुपये रोख व टीव्ही चोरण्यात आला होता. दरम्यान, आज पकडण्यात आलेल्या दीपककडून चोरण्यात आलेला टीव्ही एलसीबीने जप्त केला आहे.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: