क्राईम डायरीमुख्य बातम्या

घरासमोरील महिलेसोबत त्‍याचे होते अनैतिक संबंध… पत्‍नीला कळताच तिचा छळ मांडला!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः घरासमोरील महिलेसोबत असलेल्या अनैतिक संबंधास विरोध केल्याने पत्‍नीचा छळ मांडल्याचा धक्‍कादायक प्रकार बुलडाणा शहरात समोर आला आहे. या प्रकरणी शहर पोलिसांनी पती व सासूविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

चैताली प्रशांत गवळे (32, रा. मंगलमूर्तीनगर, उल्हासनगर, ह.मु. बुलडाणा) या महिलेने याप्रकरणी तक्रार दिली आहे. चैतालीचा विवाह ठाणे येथील प्रशांत प्रकाश गवळे याच्याशी मे 2016 मध्ये झाला होता. विवाहितेच्या वडिलांनी हुंड्यात 5 लाख रुपये दिले होते. मात्र लग्‍नानंतर केवळ 1 महिनाच तिला पतीने चांगले वागवले. प्रशांतचे घरासमोरीलच एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याचे तिला कळाले. याबाबत विचारणा केली असता त्‍याने तिला मारहाण करायला सुरुवात केली. त्यानंतर तिला उपाशीपोटी ठेवून तिच्याकडून अवघड काम करून घ्यायचा. ती आजारी असताना तिला दवाखान्यात सुद्धा नेत नव्हता. कार घेण्यासाठी त्याने तिला 5 लाख रुपये माहेरहून आणायला सांगितले. मात्र चैतालीच्या वडिलांची आर्थिक स्थिती उत्तम नसल्याने तिने नकार दिला असता कंबरेच्या पट्ट्याने मारहाण केली. पत्‍नीला तो माहेरच्यांसोबत फोनवरही बोलूही देत नव्हता. चारित्र्यावर नेहमी संशय घेऊन शारीरिक व मानसिक छळ करायचा, असेही विवाहितेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. छळाला कंटाळून ती दोन वर्षांपासून माहेरी बुलडाणा येथे राहते. 5 लाख रुपये द्या तरच तिला नादवतो, असे  तिचा पती प्रशांत गवळे याने म्हटले असल्याचे तक्रारीत म्‍हटले आहे. काल रात्री उशिरा याप्रकरणी विवाहितेचा पती प्रशांत प्रकाश गवळे व सासू आशाबाई प्रकाश गवळे (रा उल्हासनगर,ठाणे) यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: