क्राईम डायरीमुख्य बातम्या

घरासमोरील मोटारसायकल पेटवली; बुलडाण्यातील घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः भांडणाचा राग मनात धरून मोटारसायकल पेटविण्यात आल्याची घटना बुलडाणा शहरातील भीमनगरात वॉर्ड क्रमांक २ मध्ये आज, २० ऑगस्‍टला सकाळी समोर आली. पोलिसांनी एका व्‍यक्‍तीविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे.

अशांत अशोक म्हस्के (रा. भीमनगर, बुलडाणा) असे संशयिताचे नाव आहे. जितेश विजय हिवाळे (२३, रा. भीमनगर) या तरुणाने या प्रकरणात बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. आईच्‍या नावावर असलेली मोटासायकल (क्र. MH 28-BG-2158) जितेश चालवतो. काल सायंकाळी तो व त्‍याचा मित्र रवि सावंत घरासमोर उभे असताना अशांत म्‍हस्के हा रेखा संतोष खरातसोबत त्‍याच्‍याकडे आला. तुम्ही रेखाला काय बोललात, असे म्हणून वाद घातला. आज पहाटे साडेपाचला जितेशच्‍या आईने त्‍याला झोपेतून उठवून मोटारसायकल जळत असल्याचे सांगितले. पाणी टाकून गाडी विझवली. मात्र गाडीचे ३० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. तपास सहायक फौजदार श्री. कानडजे करत आहेत.

Related Articles

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
Close
%d bloggers like this: