क्राईम डायरीमुख्य बातम्या

घरासमोर उभ्या मुलीच्‍या पाठीवर हात फिरवून गेला… वडिलांनी पाठलाग करून पकडले तर म्‍हणाला, “गलती हो गई, माफ करो…’ ; नांदुरा शहरातील घटना

नांदुरा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः घरासमोर मुली उभ्या असताना स्‍कूटीवर आलेल्या तरुणाने अल्पवयीन मुलीच्‍या पाठीवर हात फिरवला व निघून गेला. मात्र ही बाब तिच्‍या वडिलांनी पाहिल्याने त्‍यांनी धावत येऊन या तरुणाचा पाठलाग केला आणि पकडले… तर तो तरुण म्‍हणतो, गलती हो गई, माफ करो… नांदुरा पोलिसांनी या तरुणाविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे. ही घटना काल, ९ जुलैला रात्री साडेनऊच्‍या सुमारास नांदुरा शहरातील बालाजीनगरात घडली.

शेख वसीम शेख रफीक (३०, रा. गैबीनगर, नांदुरा) असे आरोपीचे नाव आहे. मुलीच्‍या पित्‍याने तक्रार दिली की, मुली घरासमोर उभ्या असताना शेख वसीम स्‍कूटीवरून तिथे आला. त्‍याने १६ वर्षीय मुलीच्‍या पाठीवरून वाईट उद्देशाने हात फिरवला. ही बाब बघितल्याने मी लगेच धावत आलो. मात्र तोपर्यंत तो पळून गेला होता. त्‍याचा पाठलाग केला असता त्‍याची स्‍कूटी राणी कोल्‍ड्रिंक्‍सच्‍या समोर दिसली. तो स्‍कूटीजवळ येताच तिच्‍या वडिलांनी व त्‍यांच्‍या मित्राने त्‍याला त्‍या कृत्‍याचा जाब विचारला असता त्‍याने मेरी गलती हो गई, मुझे माफ करो असे म्‍हणून गयावया करायला सुरुवात केली. मुलीच्‍या पित्‍याने नांदुरा पाेलीस ठाणे गाठून त्‍याच्‍याविरुद्ध तक्रार केली. त्‍यावरून पोलिसांनी गुन्‍हा दाखल केला आहे.

Related Articles

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
Close
%d bloggers like this: