खामगाव (घाटाखाली)जिल्ह्याचं राजकारणमुख्य बातम्या

चंद्रशेखर बावनकुळे शेगावमध्ये म्‍हणतात, आधी सुरुवात शिवसेनेने केली!

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः विखारी भाषेत टीका करण्याची सुरुवात आधी शिवसेनेनेच केली आहे. पंतप्रधान मोदी, देवेंद्र फडणवीस, राज्यपाल यांच्यावर शिवसेनेच्या नेत्यांनी अतिशय विखारी टीका केली होती. तेव्हा शिवसेनेला कळत नव्हते का? या सर्व वादांची सुरुवात आधी शिवसेनेनेच केली आहे, असा आरोप माजी ऊर्जा राज्यमंत्री व प्रदेश भाजपचे महामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. भाजपा युवा मोर्चाच्या एका कार्यक्रमासाठी अकोला येथे जात असताना आज, २४ ऑगस्ट रोजी शेगावात आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
केंद्रीय मंत्र्यांना अटक करण्याची आपली परंपरा नाही. अटकेतून मार्ग निघणार नाही. शांततेच्या मार्गाने यातून मार्ग निघाला असता. शिवसेनेच्या नेत्यांनी मोदीजींचा बाप काढला होता. तेव्हाच शिवसेनेला कळायला हवे होते की कधीतरी आपल्या बाबतीतही अशी टीका होऊ शकते. राज्यात हे कुणी सुरू केलं? असा सवाल चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. माजीमंत्री बावनकुळे यांनी आज शिवशंकरभाऊ पाटील यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट दिली. त्यानंतर मंदिराच्या प्रवेशद्वारावरून श्री संत गजानन महाराज यांचे दर्शन घेतले. नंतर निंबा (जि. अकोला) येथे रवाना झाले. यावेळी त्यांच्यासोबत भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष रोहित धाराशिवकर, भाजपा शेगाव शहराध्यक्ष ज्ञानेश्वर साखरे, पांडुरंग बुच, भाजपा युवा मोर्चा शेगाव शहराध्यक्ष विजय लांजुळकर, राजू अग्रवाल उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
Close
%d bloggers like this: