क्राईम डायरीमुख्य बातम्या

चहाविक्रेत्‍याने घरासमोरील झाडाला घेतला गळफास!; खामगाव शहरातील घटना

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः 42 वर्षीय व्यक्तीने राहत्या घरासमोरील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज, 23 मे रोजी दुपारी 1 च्या सुमारास खामगाव शहरातील एकतानगरात घडली. विजय घ्यारे (42) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

विजय घ्यारे यांचे खामगाव शहरातील टॉवर चौकात चहाचे दुकान आहे. सकाळी 11 वाजता ते दुकान बंद करून घरी परतले होते. दुपारी 1 च्या सुमारास घरातील सर्व जण कामात व्यस्त असताना त्यांनी घरासमोरील कढीपत्त्याच्या झाडाला गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. ही बाब कुटूंबियांच्या लक्षात येताच त्यांनी एकच टाहो फोडला. घटनेची माहिती मिळताच खामगाव शहर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा करून मृतदेह सामान्य रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. वृत्त लिहीपर्यंत आत्महत्येचे कारण कळू शकले नाही.

Related Articles

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
Close
%d bloggers like this: