क्राईम डायरीमुख्य बातम्या

चहा घेऊन परत येईपर्यंत हॉटेलसमोरून मोटारसायकल गायब!; चिखलीच्‍या मेहकर फाट्यावरील घटना

चिखली (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः हॉटेलच्या बाहेर मोटारसायकल उभी करून चहा घेणे एकाला महागात पडले. चहा घेऊन परत येईपर्यंत चोरट्यांनी मोटारसायकल गायब केली. मेहकर फाट्यावर काल, 4 एप्रिलला दुपारी 2 ते 2:30 दरम्यान हा प्रकार घडला.

चिखलीतील पुंडलिकनगरात राहणारे रवी भगत (39)भालगाव (ता. चिखली) येथे त्यांच्या मूळ गावी गेले होते. तिथून परतत असताना दुपारी 2 वाजता मेहकर फाट्यावर त्यांना त्यांचा मित्र भेटला. चहा पिण्यासाठी ते थांबले. मेहकर फाट्यावरील हॉटेल सुयोगच्या बाहेर त्यांनी मोटारसायकल उभी केली. चहा घेण्यासाठी हॉटेलमध्ये गेले. 2:30 वाजता बाहेर आले तेव्हा त्यांची दुचाकी गायब झालेली दिसली. हिरो कंपनीची एमएच 28 बीएच 5286 या क्रमांकाची दुचाकी चोरट्याने चोरल्याची तक्रार त्यांनी चिखली शहर पोलीस ठाण्यात दिली आहे.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: