बुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

चाचण्यांचा मंद वेग, रुग्ण संख्याही कमी, आज 108 नवे पॉझिटिव्‍ह रुग्‍ण!

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी) : चाचण्याचा वेग कमालीचा मंदावला अन्‌ अहवालाचीही गती कमी, असे चित्र असल्याने आज, 5 मार्चला रुग्णसंख्येत (तांत्रिक) घट झाल्याचे अवास्तव चित्र आहे. आजचा 108 हा काल आढळून आलेल्या रेकॉर्डब्रेक 446 रुग्णांच्या तुलनेत वरकरणी दिलासा देणारा आकडा असला तरी तो फसवा व अवास्तव आहे.
गत्‌ 24 तासांत आरटीपीसीआर साठी 1119, ट्राउंटसाठी 82 तर रॅपिड टेस्टसाठी 855 स्वॅब नमुने संकलित करण्यात आले. यातील रॅपिडचे सर्व अहवाल प्राप्त झाले. मात्र आरटीपीसीआरचे केवळ 8 च अहवाल मिळाले असून, हा अलीकडच्या काळातील नीचांक असावा. यामुळे तिन्ही मिळून केवळ 936 अहवाल प्राप्त झाले. परिणामी पॉझिटिव्हच्या संख्येत 108 इतकी कृत्रिम घट आली आहे. या तुलनेत 822 अहवाल निगेटिव्ह आले असले तरी दिलाशासाठी तेवढे पुरेसे नाही. यंत्रणांच्या या खालवलेल्या कामगिरीमुळे हॉट तालुक्यांतील आकडेवारी देखील कमी दिसत आहे. खामगाव यातही 36 रुग्णांसह आघाडीवर आहे. याखालोखाल चिखली 24, बुलडाणा 14, देऊळगाव राजा 8, शेगाव 9, जळगाव जामोद 7 अशी रुग्णसंख्या आहे.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: